डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातून दोन डाॅक्टरांना क्लिनचिट

पायलने आपल्यावर होत असलेल्या रॅगिंगबद्दल आपले वरिष्ठ चिंग लिंग आणि शिरोडकर यांच्याकडे तक्रार केली होती.

डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातून दोन डाॅक्टरांना क्लिनचिट
SHARES

मुंबईतल्या बहुचर्चित डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातून दोन डाॅक्टरांना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने क्लिनचिट दिली आहे. पायलने आपल्यावर होत असलेल्या रॅगिंगबद्दल आपले वरिष्ठ चिंग लिंग आणि शिरोडकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे चौकशीच्या भोवऱ्यातअडकलेल्या चिंग लिंग आणि शिरोडकर यांना आता मानवाधिकार आयोगाने क्लिनचिट दिली आहे.

नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहरे या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून पायची रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप पायलच्या कुटुंबियांनी केला होता. पायलच्या आत्महत्या प्रकरणी नायर रुग्णालयातील संबधित वैद्यकीय कर्मचारी, तज्ज्ञ तसेच विभागप्रमुख, अधिष्ठाता यांची चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचाः - २०१९ मध्ये गुन्हेगारीतील या घटनांनी वेधलं लक्ष

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा