चेंबूरमध्ये प्रेयसीच्या नावाने भितींवर, फलकांवर प्रेम संदेश


चेंबूरमध्ये प्रेयसीच्या नावाने भितींवर, फलकांवर प्रेम संदेश
SHARES

एकतर्फी प्रेमातून माथेफिरू काय करतील याचा काही नेम नाही. नुकतंच एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या नावाची जाहिरातच चेंबूरमध्ये केली. या प्रकरणी महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर चेंबूर पोलिसांनी के.के. शहा (५०) याला अटक केली आहे. शहाने चेंबूर परिसरातील सार्वजनिक भिंतीवर, रस्त्यांवरील फलकांवर, इमारतीच्या फलकांवर एका महिलेच्या नावाने प्रेम संदेश लिहिले आहेत. 


सीसीटिव्हीच्या मदतीने ओळख 

 शहा एका खासगी कंपनीत कामाला असून मागील अनेक दिवसांपासून तो एका महिलेच्या मागे लागला होता. मात्र, त्या महिलेला विचारण्याची हिंमत होत नसल्यामुळे त्याने प्रेम व्यक्त करण्यासाठी  सार्वजनिक भिंतीवर प्रेम संदेश लिहिण्यास सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने चेंबूर परिसरातील सार्वजनिक भिंतीवर, रस्त्यांवरील फलकांवर, इमारतीच्या फलकांवर नाव लिहून प्रेम व्यक्त केलं. महिला राहत असलेल्या इमारतीच्या बाहेरही त्याने प्रेम संदेश लिहिल्यानंतर राग अनावर झालेल्या महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने शहाची ओळख पटवत त्याला अटक केली.



हेही वाचा - 

नेव्ही सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

Exclusive : गँगस्टर गुरू साटम दक्षिण अफ्रिकेत, आर्थिक व्यवहार सांभाळणारा हस्तक अटकेत




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा