मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

सोमवारी पुन्हा एकदा मंत्रालयाच्या गेटबाहेर एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्तकता दाखवत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानं पुढची दुर्घटना टळली.

मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

गेल्या काही महिन्यात मंत्रालयाचं जणू आत्महत्यालय झालं आहे. या मागचं कारण म्हणजे मंत्रालय वा मंत्रालयाच्या गेटबाहेर आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा घटना थांबताना दिसत नाहीत.  सोमवारी पुन्हा एकदा मंत्रालयाच्या गेटबाहेर एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्तकता दाखवत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानं पुढची दुर्घटना टळली.

कधी घडली घटना?

दुपारी बाराच्या सुमारास मंत्रालयाच्या गेटबाहेर बबन यशवंत झोटे या व्यक्तीनं अंगावर राॅकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. झोटे धुळ्याचा रहिवासी असून तो धुळे महानगर पालिकेचा कर्मचारी असल्याचं समजतं आहे.  

नेमकं कारण काय?

झोटे याने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचं नेमकं कारण काही अद्याप समजलेलं नाही. पण झोटे हा पालिकेत कंत्राटी कर्मचारी होता आणि त्याला निलंबित करण्यात आल्याच्या नैराश्यातून त्यानं हा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या माहितीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

झोटेने अंगावर राॅकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याबरोबर पोलिसांनी त्याला त्वरीत ताब्यात घेतलं असून पुढची कारवाई सुरू असल्याचं समजतं आहे. 



दिला होता आत्मदहनाचा इशारा...

३ एप्रिल २०१८ ला झोटे यांच्यासह धुळ्यातील इतर दोन कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवलं होतं. त्यानुसार धुळ्यातील पालिकेच्या सरळसेवा भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करत झोटे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. 

एका महिन्यात चौकशी झाली नाही तर मंत्रालयाच्या गेटबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा झोटे यांनी या पत्राद्वारे दिल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्रालया प्रशासनानं या पत्राची कोणतीही दखल न घेतल्यानं झोटे यांनी सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.


याआधीच्या घटना

मंत्रालयात याआधी वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर एका तरूणाने मंत्रलायाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतरही काही जणांनी मंत्रालयाच्या बाहेर अंगावर राॅकेल ओतून आणि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

अपयशी प्रशासन

मंत्रालयात आणि मंत्रालयाबाहेर आत्महत्या वा आत्महत्येच्या प्रयत्नांचं सत्र सुरू असतानाच या घटनांना चाप लावण्यात पोलिस आणि प्रशासन मात्र अपयशीच ठरताना दिसत आहे.


हेही वाचा - 

मंत्रालयाच्या गेटसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पाऊले चालती 'सुसाईड पॉईंट'ची वाट..!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा