Advertisement

मंत्रालयाच्या गेटसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

''संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा'', असं म्हणत या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गणेश पवार असं या तरुणाचं नाव असून तो रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समजत आहे.

मंत्रालयाच्या गेटसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

मंत्रालय परिसरातील आत्महत्येचं सत्र काही संपताना दिसत नाही. वृद्ध शेतकरी धर्मा पाटील आणि त्यानंतर दोघा तरुणांनी विष प्राशन करून मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये धर्मा पाटील आणि एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशातच पुन्हा मंत्रालयाच्या गेटसमोर एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे.

कोण आहे हा तरुण?

''संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा'', असं म्हणत या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गणेश पवार असं या तरुणाचं नाव असून तो रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समजत आहे.

का केला आत्महत्येचा प्रयत्न?

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत गणेश पवार बुधवारी दुपारी मंत्रालयासमोर आला. त्याने मंत्रालयाच्या गेटजवळ अंगावर रॉकेल ओतून घेतलं. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघितला आणि त्यांनी तातडीने गणेश पवारच्या दिशेने धाव घेत त्याला रोखलं. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. गणेश पवार हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा रहिवासी आहे. तो रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता असल्याचं समजत आहे.

हेही वाचा - 

पाऊले चालती 'सुसाईड पॉईंट'ची वाट..!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा