मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न, तीन पत्रकार ताब्यात

ठाकरे यांच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने खालापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न,  तीन पत्रकार ताब्यात
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्याच्या परिसरात घुसखोरी करू पाहणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या तीन पत्रकारांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाकरे यांच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने खालापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचाः कंगनाचा नाद सोडा...गृहमंत्र्यांना पून्हा धमकी

खालापूर इथं उद्धव ठाकरे यांचं ठाकरे फार्म हाऊस नावाचं फार्म हाऊस आहे. मंगळवारी एका गाडीतून आलेले तीन व्यक्ती या बंगल्याच्या परिसरात फिरत ठाकरे फार्म हाऊसचा पत्ता विचारत होते. त्याचवेळी ठाकरे फार्मवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा कर्मचारी रस्त्यावरून नाईट ड्युटीला निघाला होता. भिलवरे डॅमजवळ या तिघांनी कार थांबवून ठाकरे फार्म हाऊसचा पत्ता त्याला विचारला. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असल्यामुळे त्याने माहीत नाही, असं उत्तर दिलं आणि तो पुढे निघून गेला. काही वेळाने सुरक्षा रक्षक ठाकरे फार्म हाऊसच्या सुरक्षा चौकीत बसला असताना. या तिघांची कार ठाकरे फार्म हाऊसच्या गेटवर आली. त्यावेळी तिघांनी पत्ता माहिती असताना, का नाही सांगितला, यावरून सुरक्षा रक्षकासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. एवढ्यावरच नं थाबता तिघांनी सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

हेही वाचाः कंगनाचं कार्यालय बीएमसीने तोडलं

या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने खालापूर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात ४५२,४४८, ३२३,५०४, ५०६,३४ अन्वेय गुन्हा नोंदवून तिघांना ताब्यात घेतलं आहे. हे तिघेही एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे पत्रकार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान मातोश्रीवर आलेल्या धमकीच्या फोननंतर बंगल्यावरील सुरक्षा वाढण्यात आली आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा