कंगनाचा नाद सोडा...गृहमंत्र्यांना पुन्हा धमकी

या पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर आणि शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी अशा धमकीचे फोन खणखणले होते.

कंगनाचा नाद सोडा...गृहमंत्र्यांना पुन्हा धमकी
SHARES

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सुनिल प्रभू यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाची ड्रग्ज टेस्ट करण्याचे आदेश दिले. हे आदेश दिल्यानंतर बुधवारी सकाळी ६ वा. गृहमंत्र्यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या फोनच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले आहे. या पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर आणि शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी अशा धमकीचे फोन खणखणले होते.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावतने बाॅलीवूडमधील अनेकांची पोल खोल केली. मात्र यात  राजकारण्यांनी उडी घेतल्यानंतर कंगना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत. अशातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनिल प्रभू  दिलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत, काल महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी कंगना राणावत हिची सुद्धा ड्रग्ज टेस्ट होणार असल्याचे सांगत मुंबई पोलिसांना सुद्धा याच संदर्भात आदेश सुद्धा दिले होते. याबाबत एकीकडे अनिल देशमुख यांनी भाष्य करताच त्याच्या काही वेळानंतरच त्यांच्या नागपुर येथील कार्यालयात धमकीचे फोन यायला सुरुवात झाली. या संदर्भात अनिल देशमुख यांच्या कार्यालयातील अधिकार्‍यांनी माहिती दिली, हे फोन कुठुन आले होते, कोणी केले होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. यापुर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातेश्री बंगल्यावर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिलव्हर ओक  निवासथानी अशा प्रकारे धमकीचे फोन आले होते. त्या कॉल्सचा संबंध कुख्यात अंडरवर्ल्ड गुंड दाउद इब्राहिम याच्याशी असल्याच्या चर्चा सुद्धा होत्या.  या पूर्वी आलेल्या धमकीच्या फोनचा माग काढण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. यातील एक फोन हा हिमाचल प्रदेश तर दुसरा दिल्लीतून आला होता. 

हेही वाचाः- मुलीला न्याय मिळावा म्हणून इंद्रजीत चक्रवर्ती 'कृष्णकुंज'वर जाणार

पावसाळी अधिवेशेन सुरू असताना अशा प्रकारे गृहमंत्र्यांना मिळालेल्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे अशातच अध्ययन सुमन यांनी कंगना राणावत ड्रग्ज घेते आणि ती मला देखील घेण्यास जबरदस्ती करत होती असा खबळजनक आरोप केला होता. त्याचा दाखला सुद्धा देशमुख यांनी दिला होता. दरम्यान, कंगना राणावतने सुद्धा काल अनिल देशमुख यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत जर का माझी चाचणी झाली तर आनंदच आहे, मी जर दोषी आढळले तर मान्य करेन आणि मुंबई कायमची सोडेन असेही कंगना म्हणाली होती. आज कंगना मुंबईत परतणार आहे यासाठी ती हिमाचल प्रदेश च्या मुळगावहुन निघाली आहे.   

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा