ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी 'अशी' केली परप्रांतीय मच्छीमारांना मारहाण

ठाण्यातील कोलबाड परिसरात शुक्रवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी 'अशी' केली परप्रांतीय मच्छीमारांना मारहाण
SHARES

अनधिकृत फेरीवाल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांकडे वळवला आहे. ठाण्यातील कोलबाड परिसरात शुक्रवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.


म्हणून, मच्छीविक्रेत्यांना मारहाण

ठाणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात कोळी समाज आहे. ते गेली अनेक वर्षांपासून मासे विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र सध्या कोलबाड परिसरातील रस्त्यांवर परप्रांतीय मच्छी विक्रेतेही बसू लागले आहेत. एका रांगेत जवळपास २० ते २५ मच्छी विक्रेते इथं बसतात. त्यातील बहुतांश मच्छी विक्रेते परप्रांतीय असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी या मच्छी विक्रेत्यांना मारहाण केली.




स्थानिक कार्यकर्ते

स्थानिक कोळी समाज आणि मराठी माणसालाच इथं मासे विकण्याचा हक्क आहे, असं म्हणत ही मारहाण करण्यात आली. परप्रांतीय मच्छीविक्रेत्याला मारहाण करणारे सर्व मनसे कार्यकर्ते स्थानिक असून अद्याप त्यांची नावं कळू शकलेली नाहीत.


कोळी बांधव हे इथले खरे भूमिपूत्र आहेत. ठाणे, मुंबई ही त्यांची मायभूमी आहे. मात्र परप्रांतीयांच्या हस्तक्षेपामुळे ते प्रत्येक क्षेत्रात मागे पडत असतील, तरी अशी प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. मराठी बांधवांच्या हक्कासाठी असलेला मनसेचा लढा आणखी तीव्र होत जाईल. जिथे जिथे परप्रांतीय मराठी माणसाच्या व्यवसायावर आक्रमण करतील, तिथं तिथं आम्ही खळ्ळ् खट्याक करणार. या परप्रांतीयांनी त्यांच्या गावी जाऊन तिथं शेती करावी.
- अभिजीत पानसे, मनसे नेता (ठाणे)



हेही वाचा-

बिस्लेरी बाटल्यांवरील लेबल्स मराठीत, पण कुणामुळे?

बँकांचे व्यवहार मराठीत करा! नाहीतर खळ्ळ् खट्याक्?

इतकं घोंचू, बिनडोक सरकार बघितलं नाही - राज ठाकरे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा