रायन कुटुंबाला आणखीन एक दिवसाचा दिलासा


रायन कुटुंबाला आणखीन एक दिवसाचा दिलासा
SHARES

रायन इंटरनॅशनल शाळेच्या संस्थापक कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने आणखी एका दिवसाचा दिलासा दिला आहे. याप्रकरणी आता गुरुवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

हरियाणाच्या गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत ७ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळेच्या संस्थापक कुटुंबाला देखील आरोपींच्या पिंजाऱ्यात उभे करण्यास आले अाहे. यामध्ये ऑगस्टीन पिंटो, त्यांची पत्नी ग्रेस पिंटो आणि मुलगा रायन पिंटो यांचा समावेश आहे. या तिघांनीही अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यातच गुरूग्रामचे पोलीस देखील या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत येऊन दाखल झाले आहेत.

जामिनासंदर्भातील निकाल बुधवारी येणे अपेक्षित होता. मात्र सरकारी वकिलांनी आम्हाला अटकपूर्व जामिनाला विरोध करणाऱ्या अर्जाची कागदपत्रे दिली नाहीत. त्यासह आम्हाला हरियाणा येथील न्यायालयात वकील मिळत नाही, असा दावा पिंटो यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला. याच धर्तीवर न्या. धर्माधिकारी यांनी अटकपूर्व जामिनावरील सुनावाणी एका दिवसाने पुढे ढकलली आहे. यामुळे सुनावाणी होईपर्यंत पोलिसांना पिंटो कुटुंबीयांपैकी कुणालाही अटक करता येणार नाही.  

तर, 'पिंटो कुटुंबीयांच्या वाकिलांनी न्यायालयात केलेले दावे हे अर्थहीन असून हा बचाव पक्षाचा वेळ काढूपणा करण्याची युक्ती आहे, असे सरकारी पक्षाचे वकील गुणरत्न सदवरते म्हणाले.

गुरुग्राम येथील शाळेतील वातावरण विद्यार्थ्याच्या हत्येनंतर चांगलेच बिघडले असून रायन कुटुंबीयांचा खटला कुणीही न लढवण्याचा ठराव स्थानिक बार असोसिएशनने केल्याचे यावेळी वाकिलांनी न्यायालयात सांगितले.

या संपूर्ण घटनेची पिंटो कुटुंबीयांनी देखील निंदा केली असून शाळेत झालेल्या प्रकाराला थेट संस्थापकांना दोषी ठरवले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. तर त्यांचा मुलगा रायन पिंटो याने आपला या शाळेशी काहीही संबध नसल्याचे म्हटले आहे.



हेही वाचा - 

कांदिवलीतील रायन स्कूलमुळं 'यांच्या' मुलाचं वर्ष वाया

स्कूलबसमध्ये महिला बसवाहक नेमणार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा