NCB चे दोन अधिकारी निलंबित, जामीनसाठी बाॅलीवूड तारकांना मदत केल्याचा आरोप

प्रसिद्ध अभिनेत्री दिपिका पदुकोन हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि काँमेडियन भारती सिंह यांना जामीनासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली NCBच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

NCB चे दोन अधिकारी निलंबित, जामीनसाठी बाॅलीवूड तारकांना मदत केल्याचा आरोप
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी सर्वत्र झाडाझडती सुरू केली. त्याच्या चौकशीत अनेक बाँलीवूड कलाकारांची नावे समोर आल्यानंतर काहीची चौकशी तर काहींना अटक देखील करण्यात आली. या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री दिपिका पदुकोन हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि काँमेडियन भारती सिंह  यांना जामीनासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली  NCBच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

हेही वाचाः- 'बेस्ट'मधील २ हजार ६९० कर्मचारी कोरोनामुक्त, ५२ जणांचा मृत्यू

कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना त्याज तस्करी प्रकरणात अटक केल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी  त्या दोघांच्या वतीने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केले होते. त्या नुसावणीला तपास अधिकाऱ्यांनी जामीनाला विरोध करत कस्टडीची मागणी करणे अपेक्षित होते. मात्र तपास अधिकारी पंकज कुमार त्यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे दोघांना जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पंकज कुमार यांना निलंबित केले असल्याचे NCB च्या सूत्रांनी मिहीती दिली आहे. सरकारी वकिल यांनी पुढील सुनावनी २४ तारखेला असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात असताना. सरकारी वकिल यांनी हे आरोप खोडून काढत मी या पूर्वीच सुनावनी दरम्यान येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कारण ठाण्यातील एका एनसीबी केससाठी मी त्या ठिकाणी जाणार होतो.

हेही वाचाः- कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी 'यांची' होणार कोरोना चाचणी

तर दिपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश प्रकरणात तिला एका अधिकाऱ्याने वकिल मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या संभाषणाचे आॅडिओ क्लिपही NCBकडे आहेत. त्यात त्याने करिश्माला २७(अ) म्हणजे पैसे पुरवणे आणि आरोपींना आश्रय दिल्याचे कलम न लावण्यासाठीही मदत करतो असे म्हटले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  आँक्टोंबर महिन्यात करिश्माच्या घरातून NCBने १,७ ग्रॅम गांजा, सीबीडी तेलाच्याकाही बाटल्या हस्तगत केल्या होत्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा