लाल पावडरमधून ड्रग्जची विक्री; तस्करांकडून ड्रग्जचा नवीन प्रकार

लाल पावडर या नवीन अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अाहे. ही लालपावडर केटामाईन ड्रग्जसारखीच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात अालं. पोलिस अाता या लालपावडरची तस्करी करणाऱ्यांच्या मागावर अाहेत.

लाल पावडरमधून ड्रग्जची विक्री; तस्करांकडून ड्रग्जचा नवीन प्रकार
SHARES

मुंबई पोलिस अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधातील फास जसजसे आवळू लागलेत तसतसे तस्कर नवीन अंमली पदार्थ बाजारात आणून तरूणांभोवतीचा नशेचा विळखा घट्ट करत अाहेत. काही दिवसांपूर्वी तस्करांनी डुकूका या नवीन अंमली पदार्थाची शहरात तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. त्याच पार्श्वभूमीवर आता लाल पावडर या नवीन अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अाहे.  ही लालपावडर केटामाईन ड्रग्जसारखीच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात अालं. पोलिस अाता या लालपावडरची तस्करी करणाऱ्यांच्या मागावर अाहेत.


नव्याने बाजारात 

शहरात येणाऱ्या प्रत्येक अंमली पदार्थांवर पोलिसांची करडी नजर असते. काही दिवसांपूर्वीत एका आंतरराष्ट्रीय टोळीने भारतात डुकूका हा अंमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न केला. भारतात या अंमली पदार्थावर बंदी नसल्याचा फायदा घेत त्यांनी डुकूका भारतात आणल्याचं चौकशीत पुढं आल्यानंतर पोलिसांनी ८ जणांना अटक केली. पोलिसांना त्यांच्याकडे २५० किलो डुकूका सापडला होता.  डुकूका हा पदार्थ घेऊन येणाऱ्या व्यक्तीला केवळ झडती घेऊन सोडण्यात येत असल्याने तस्कर डुकूकाच्या तस्करीला प्राधान्य देत असल्याचं तपासात उघडकीस अालं. मात्र तस्करांचे प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी केटामाइनप्रमाणेच नशेसाठी वापरली जाणारी लाल पावडर नव्याने बाजारात आणली.


दंतमंजनच्या नावाखाली विक्री

पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केटामाइनप्रमाणेच हा अंमली पदार्थ केमिकल टाकून बनवला जातो.  कुणालाही संशय येऊ नये यासाठी लाल रंग देऊन हा अंमली पदार्थ छोट्या-मोठ्या डब्यातून दंतमंजनच्या नावाखाली विकला जातो. पोलिसांना नुकतंच या लाल पावडरची माहिती मिळाली. पोलिस या पावडरची निर्मीती करणाऱ्या आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असल्याचं एएनसीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.  हेही वाचा -

ड्रग्ज तस्कर महिलेला विमानतळावर अटक; ४६५ ग्रॅम अॅफेटामाइन जप्त

सावधान! ब्रॅंडेड दुधाच्या पिशवीत भेसळयुक्त दूध, भेसळखोरांचं रॅकेट उघड
संबंधित विषय