लग्नाच्या १३ दिवसानंतरच पुनम पांडेची नवऱ्याविरोधात तक्रार

पूनमनं आपल्या पतीवर तिला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याविरोधात तिनं पोलिसात धाव घेतली आहे.

लग्नाच्या १३ दिवसानंतरच पुनम पांडेची नवऱ्याविरोधात तक्रार
SHARES

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेनं याच महिन्यात बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं. पण लग्नाला काही दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्यात बिनसल्याचं देखील समोर आलं आहे. पूनमनं आपल्या पतीवर तिला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याविरोधात तिनं पोलिसात तक्रार देखील दाखल केली.

गोवा पोलिसांनी सॅम बाँम्बेला याप्रकरणी अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बेला मंगळवारी गोव्यात अटक करण्यात आली. पूनमनं पतीविरोधात जीवे मारण्याची धमकी आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.

दक्षिण गोव्यातील कैराकोना गावातील आहे. इथं पूनम पांडे एका चित्रपटाचं शूटिंग करत होती. सोमवारी उशीरा रात्री तिनं तक्रार दाखल केली. त्यानंतर सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली आणि पूनमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

पूनम पांडेनं यावर्षी १० सप्टेंबर रोजी आपला प्रियकर सॅम बॉम्बेसोबत सिक्रेट लग्न केलं होतं. सिक्रेट वेडिंगनंतर दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लग्न समारंभाची काही छायाचित्रे शेअर केली होती. इंस्टाग्रामवर छायाचित्रे शेअर करुन पूनम पांडेनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "पुढील सात जन्म तुझ्यासोबत राहून आनंद होईल."

सॅम बॉम्बेचा जन्म संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई इथं झाला. तो अ‍ॅड-फिल्ममेकर आणि निर्माता आहे. ३६ वर्षीय सॅमनं अक्षय कुमार, रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, तमन्ना भाटिया, अल्लू अर्जुन आणि इतर नामांकित फिल्मस्टार्ससोबत प्रोजेक्ट केले आहेत.



हेही वाचा

दिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा