कमला मिल आग: मोजोस बिस्ट्रोच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


कमला मिल आग: मोजोस बिस्ट्रोच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
SHARES

अग्निशमन विभागाच्या चौकशी अहवालात कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेली आग मोजोस बिस्ट्रो पबमधून सर्वत्र पसरल्याचं स्पष्ट झाल्यावर ना. म. जोशी पोलिसांनी या पबचे मालक युग तुली आणि युग पाठक या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्ह दाखल केला आहे.


चौकशीत स्पष्ट

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबमध्ये गेल्या आठवड्यात आग लागली होती. या आगीत दोन्ही पब जळून खाक झालेच, पण वन अबोव्ह पबमधील १४ जणांचा नाहक मृत्यूही झाला होता. या सर्व प्रकाराला कारणीभूत ठरवत पोलिसांनी वन अबोव्ह पबचे मालक क्रिपेश संघवी, जीगर संघवी आणि अभिजीत मानकर अशा तीन संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. या दुर्घटनेला ८ दिवस उलटून देखील तिघांपैकी एकाही फरार आरोपीला पकडण्यात यश न आल्याने पोलिसांनी या तिघांच्या डोक्यावर १ लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं.


गुन्हा दाखल

मात्र ही आग नेमकी कुठून आणि कशामुळे लागली, या कारणांचा अग्निशमन दलाने शोध घेतल्यानंतर ही आग सर्वप्रथम मोजोस बिस्ट्रोमध्ये लागली आणि वन अबोव्हपर्यंत पोहोचली ही स्पष्ट झालं. तसा चौकशी अहवाल अग्निशम दलाने महापालिका आयुक्तांना अधिकृतरित्या सादर केल्यानंतर आता पोलिसांनी 'मोजो बिस्ट्रो'चे मालक युग तुली आणि आणि युग पाठक यांच्यासह पबच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.


जबाब नोंद

तत्पूर्वी ना. म. जोशी मार्ग पोलिसांपुढे मोजोस बिस्ट्रोच्या दोन्ही मालकांनी आपापले जबाब नोंदवले असून दोघांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!

वन अबोव्हच्या फरार मालकांवर १ लाखांचं इनाम

माझ्यावर गुन्हा का नोंदवला? मोजोस बिस्ट्रोच्या मालकाचा सवाल


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा