नक्षलवाद्यांशी संबंध: तेलतुंबडे यांना न्यायालयाचा दिलासा, २६ आॅक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश


नक्षलवाद्यांशी संबंध: तेलतुंबडे यांना न्यायालयाचा दिलासा, २६ आॅक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश
SHARES

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता होती. मात्र अटकेपूर्वीच तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तेलतुंबडे यांना २६ आॅक्टोबरपर्यंत अटक करू नका, असे आदेश देत न्यायालयानं पुणे पोलिसांना झटका दिला आहे. त्याचवेळी गुन्हा रद्द करण्याचेही आदेश न्यायालयानं दिले आहेत.


नक्षलवाद्यांशी संबंधांवरून गुन्हा

एल्गार परिषद आणि भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी नक्षलवादी याप्रकरणा मागे असल्याचं म्हणत नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईदरम्यान ५ जणांना अटकही केली. दरम्यान याच कारवाईत तेलतुंबडे यांचंही नाव असून त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दरम्यानच्या काळात त्यांच्या गोव्यातील घरावरही पोलिसांनी छापा टाकला होता.


गुन्हा रद्द करण्याची मागणी

दरम्यान तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार तेलतुंबडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान आपल्याविरोधात पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत. पोलिसांकडून आपल्याया या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचं तेलतुंबडे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं.

त्यानुसार २६ आॅक्टोबरपर्यंत तेलतुंबडे यांच्याविरोधात कोणतीही कडक कारवाई करू नये वा त्यांना अटक करू नये, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

नक्षलवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट- पोलिस

'स्टॅटर्जी आॅफ टॅक्टीस इन इंडिया' नुसार नक्षलवाद्यांनी अाखली व्यूहरचना



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा