बॉम्बे रुग्णालयातून उडी मारून ६७ वर्षीय रुग्णाची आत्महत्या

मुंबईतल्या मरिन लाइन्स येथील बॉम्बे रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून ६७ वर्षीय रुग्णानं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

बॉम्बे रुग्णालयातून उडी मारून ६७ वर्षीय रुग्णाची आत्महत्या
SHARES

मुंबईतल्या मरिन लाइन्स येथील बॉम्बे रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून ६७ वर्षीय रुग्णानं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सतीश खन्ना असं या रुग्णाचं नाव असून, गुरुवारी आत्महत्या केली आहे. सतीश खन्ना हे उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रक्तदाबाचा त्रास

सतीश खन्ना हे चेंबूर येथील रहिवाशी आहेत. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळं त्यांना फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार १५ जुलै रोजी बॉम्बे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, उपचारानंतर सतीश खन्ना यांना गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात येणार होतं.

जागीच मृत्यू

यासाठी लागणारी कागदपत्रं घेण्याकरीता त्यांचा मुलगा कार्यालयात आणि पत्नी डॉक्टरांशी बोलण्यासाठी गेली होती. त्यावेळी गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास त्यांनी अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत खन्ना यांचा जागीच मृत्यू झाला. तसंच, आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.हेही वाचा -

बायोमेट्रीक हजेरीविरोधात महापालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

आगीवर विझविण्यासाठी 'फायर रोबो' करणार अग्निशमन दलाच्या जवानांची मदतRead this story in हिंदी
संबंधित विषय