पीएमसी बँकेत पतसंस्थांचे अडकले 'एवढे' कोटी

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांचा फटका फक्त बँकेच्या ग्राहकांनाच नाही तर राज्यातील १४७ पतसंस्थांनाही बसला आहे.

पीएमसी बँकेत पतसंस्थांचे अडकले 'एवढे' कोटी
SHARES

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांचा फटका फक्त बँकेच्या ग्राहकांनाच नाही तर राज्यातील १४७ पतसंस्थांनाही बसला आहे. या पतसंस्थांचे तब्बल ४५० कोटी रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. त्यामुळे या पतसंस्थाही धोक्यात आल्या आहेत.

पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने अनेक निर्बंध बँकेवर घातले आहेत. त्यामुळे ग्राहकांना ठरावीक मर्यादेतच पैसे काढण्याची मुभा आहे. परिणामी बँकेचे ग्राहक हवालदील झाले आहेत. यातच पाच खातेदारांचा मृत्यू झाला आहे. बँकेवरील या निर्बंधांची झळ राज्यातील १४७ पतसंस्थांना बसली आहे.  या पतसंस्थांचे ४५० कोटी रूपये पीएमसीत अडकल्याने पतसंस्थांचे गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. 

पीएमसी बँकेत पतसंस्थांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसारच गुंतवणूक केली आहे. २०१२ पर्यंत या बँकेला अ दर्जा होता. त्यानुसार बँकेत गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बँक अडचणीत आली.  यासाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता पतसंस्था फेडरेशनकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा -

PMC खातेदारांसाठी खूशखबर, पैसे काढण्याची मर्यादा 'इतकी' वाढवली

PMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा