अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून अश्लील चित्रीकरण

वाकोला परिसरात राहणाऱ्या या दोन्ही मुली महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी जानमने या दोन्ही मुलींना इन्स्ट्राग्रामवर पाहिले होते. तेव्हापासून तो दोन्ही मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दोन्ही मुली त्याला दाद देत नव्हत्या.

SHARE

अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची भिती दाखवत त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यास वाकोला पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. जानम पोरवाल (२०) असं आरोपीचे नाव असून तो उच्चशिक्षित आहे.


नग्न रेकाॅर्डिंग

वाकोला परिसरात राहणाऱ्या या दोन्ही मुली महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी जानमने या दोन्ही मुलींना इन्स्ट्राग्रामवर पाहिले होते. तेव्हापासून तो दोन्ही मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दोन्ही मुली त्याला दाद देत नव्हत्या. अखेर जानमने मुलींच्या इन्स्ट्राग्राम खात्यातून काही फोटो डाऊनलोड करत, ते मार्फ करून त्यांना टॅग केले. मुलींनी मार्फ केलेले अश्लील फोटो पाहून जानमशी इन्स्टाग्रामवर संपर्क केला. त्यावेळी जानमने त्या मुलींचे इतरही फोटो मार्फ केले असल्याचं उघडकीस आलं. हे फोटो सार्वजनिक करण्याची धमकी तो मुलींना देत होता. तसंच मुलींना व्हिडिओ काॅल करून त्यांना नग्न होण्यास भाग पाडून ते रेकाॅर्डिंग करायचा.


परदेशातील फोन नंबर

 जानमच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलींनी ही बाब आपल्या घरातल्यांना सांगितल्यानंतर घरातल्यांनी वाकोला पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिस तपासात जानम पोरवाल या दोन्ही मुलींना स्पूफ कॉलवरुन फोन करायचा. त्यामुळे या मुलींच्या फोनच्या डिस्प्लेवर परदेशातील फोन नंबर दिसायचा. जानम जेव्हा या मुलींना फोन करायचा तेव्हा त्याने त्याचा चेहरा झाकलेला असायचा असं मुलीनं तक्रारीत म्हटले आहे. स्पुफींग टेक्नोलॉजीमुळे आरोपीला पकडण्यास पोलिसांना महिना लागला. तीन महिन्यांपासून तो मुलींना त्रास देत होता, अशी माहिती वाकोला पोलिसांनी दिली.हेही वाचा - 

लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून महिलेला १७ लाखांचा गंडा

कारच्या धडकेत पोलिस शिपाई जखमी
संबंधित विषय
ताज्या बातम्या