पाचव्या लुटीत 'त्यांची' डाळ नाही शिजली


पाचव्या लुटीत 'त्यांची' डाळ नाही शिजली
SHARES

गुन्हेगार कितीही चलाख असला तर कधीना कधी त्याला गजाअाड व्हावंच लागतं. चार गुन्ह्यात पोलिसांना चकमा देणारे अारोपी पाचव्या गुन्ह्यात मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले अाहेत.  बंदुकीच्या धाकावर भूलेश्वर परिसरात व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली अाहे. यापूर्वीच्या ४ लुटींमध्ये ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. मात्र, ५ व्या लुटीत अारोपींची डाळ शिजली नाही. अगोदरच्या गुन्ह्यांचीही कबुली अारोपींनी दिली अाहे.


१४ लाख लुटले

भूलेश्वर परिसरात एका ज्वेलर्सकडे प्रकाश मंडल हे मॅनेजर म्हणून कामाला अाहेत. २९ मे च्या संध्याकाळी मंडल नोकरासोबत दुकानात होते. यावेळी तिघे जण बंदुक आणि इतर शस्त्रांसह  दुकानात घुसले. बंदुकीच्या धाकावर त्यांनी दुकानात असलेली १४ लाख रुपयांची रोकड लुटली.  या दरोडेखोरांचा माग काढत पोलिसांनी या प्रकरणातील मास्टर माइंड युनूस काझी (४०) याला राजस्थानमधून अटक केली. तर सलेम मन्सुरी, मनोज गुप्ता, इलियास यांनाही अटक केली अाहे.


ज्वेलर्स टार्गेट

या लुटीचा योजना युनुस काझीची होती. २०१२ मध्ये युनुस भूलेश्वर येथील व्यापाऱ्याकडे कामाला होता. यावेळी नुसत्या विश्वासावर व्यापारी लाखभर रुपयात मोठे व्यवहार अनधिकृतरित्या करत असल्याचं त्याच्या लक्षात अालं. त्यानंतर युनुसने अापल्या साथीदारांच्या मदतीने या व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. लुटीनंतर ते पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी व्हायचे.  

युनुसवर २०१२ मध्ये लुटीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. लुटीतून मिळणारे पैसे हे सर्व समान वाटून घ्यायचे. व्यापाऱ्याकडे कामाला राहून दुकानाची रेकी करून ते दुकान लुटायचे. पकडले गेल्यावर पोलिसांची मारहाण सहन व्हावी यासाठी युनुसने तुरूंगात व्यायामाला सुरूवात केली होती. या टोळीवर विविध राज्यांमध्ये दहा गुन्ह्यांची नोंद अाहे. 



हेही वाचा - 

चेंबूरमध्ये मुलावर अनैसर्गिक अत्याचार, सख्ख्या भावांवर गुन्हा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या 'या' हस्तकाला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा