अल्पवयीन मुलींना अश्लील संदेश, पवईतून दोघांना अटक

मानसिक तणावात असलेल्या मुलीच्या स्वभावात घडलेला बदल घरातल्यांनी पाहिल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेत, तिच्याजवळ विचारपूस केली. त्यावेळी मुलीने घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला.

अल्पवयीन मुलींना अश्लील संदेश, पवईतून दोघांना अटक
SHARES

पवईतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवून तिला त्रास देणार्या दोघांना गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अटक केली आहे. संदीप निषाद (२०), कुश यादव (२०) अशी या दोघांची नावे आहेत. मुलीच्या मित्राकडून नंबर मिळवत या दोघांनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. न्यायालयाने या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय

महाविद्यालयात शिकणाऱ्या या मुलीला मागील अनेक दिवसांपासून निनावी नावाने फोन आणि अश्लील मेसेज येत होते. या घटनेमुळे पीडित तरुणी पूर्णतहा घाबरली होती. मानसिक तणावात असलेल्या मुलीच्या स्वभावात घडलेला बदल घरातल्यांनी पाहिल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेत, तिच्याजवळ विचारपूस केली. त्यावेळी मुलीने घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. मुलीच्या घरातल्यांनी या प्रकरणी पवई पोलिसात ५०९, ३५४(५) अंतर्गत दोन आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला.

हेही वाचाः- वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली

या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा १० चे पोलिस ही या घटनेचा समांतर तपास करत होते. पोलिसांनी तांत्रिक माहिच्या आधारे पवईतून संदीप आणि कुश या सर्व प्रकरणामागे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांनी गुन्ह्यांची कबूली दिली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा