कोरोनामुळे मुंबईत पोलिसाचा मृत्यू

मुंबईतील एका ५७ वर्षीय कोरोनाबाधित कॉन्स्टेबलचा नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनामुळे मुंबईत पोलिसाचा मृत्यू
SHARES

 मुंबईतील एका ५७ वर्षीय कोरोनाबाधित पोलिस हवालदाराचा नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे.  कोरोनामुळे मुंबईत पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. मृत पोलिस वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते वरळी येथे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मुंबईतील पोलीस अहोरात्र सेवा करत आहे. त्यामुळे अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मृत पोलिसाला २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता .त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यात ९६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात आता कोरोनाची लागण होऊन मुंबईत पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दल हादरलं आहे.


हेही वाचा -

क्वॉरन्टाईन सेंटरसाठी मुंबई महापालिकेच्या शाळा

मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये एकही नवीन रूग्ण नाही




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा