मास्क न घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली

पालिकेचे अधिकारी ग्रँट रोड, नाना चौक, मलबार हिल परिसरात पोलिसांची मदत घेत कारवाई करत आहेत.

मास्क न घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली
SHARES

मास्क न लावताच सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. दंडाची रक्कम २०० रुपये केल्यानंतरही दंड न भरणाऱ्या आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अरेरावी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. पालिकेचे अधिकारी ग्रँट रोड, नाना चौक, मलबार हिल परिसरात पोलिसांची मदत घेत कारवाई करत आहेत.

हेही वाचाः- कोरोनाचा एसटीतील 'त्या' भरती प्रक्रियेला फटका

कोरोनाचा संसर्ग नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने मास्क लावण्याचा नियम राज्य सरकारने अनिवार्य केला आहे. मात्र तरीही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावरत असतात. मुंबईत सप्टेंबर महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मास्क न लावताच फिरणाऱ्यांविरोधात सर्वच विभागांनी आपापल्या पातळीवर कारवाई कडक केली आहे. मास्क न लावणाऱ्यांकडून पूर्वी जो १००० रुपये दंड वसूल केला जात असे, तो आता पालिकेने २०० रुपयांपर्यंत आणला आहे. पालिकेच्या घन कचरा विभागातर्फे हा दंड वसूल केला जातो. मात्र तरीही अनेक लोक मास्कही लावत नाही आणि दंडही भरत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या डी. विभाग कार्यालयाने आता पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

हेही वाचाः- Good News: राज्यात पोलिसांची मेगा भरती; १२,५२८ जागा भरणार

मलबार हिल, नाना चौक, ताडदेव, ग्रँट रोड, लॅमिंग्टन रोड यांचा भाग असलेल्या डी. विभागात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळेच पालिकेकडून या परिसरात मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडात्मक करावाई करण्यास सुरूवात केली. मात्र अनेकदा कारवाई दरम्यान पालिका आणि नागरिकांमध्ये खटके उडाले. काही बेशिस्त नागरिकांनी तर पालिकेच्या अधिकाऱ्यांवरच अरेरावी केली. त्यामुळेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने या पुढील कारवाईचे नियोजन केले. या व्यतिरिक्त मुंबई पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाईही सुरूच आहे. १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण मुंबईत पोलिसांनी मास्क न घातल्याप्रकरणी १२ जणांवर कारवाई केली आहे. तर लाँकडाऊन दरम्यान ५३३७  मास्क न घालणाऱ्यांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे.  

संबंधित विषय