लोकल गार्डचे तरुणीसमोर अश्लील चाळे


लोकल गार्डचे तरुणीसमोर अश्लील चाळे
SHARES

लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करताना महिलांची छेडछाड किंवा त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. असाच प्रकार आता घणसोलीत उघडकीस आला आहे. चालत्या रेल्वेत महिलांना गुप्तांग दाखवून अश्लील चाळे करणाऱ्या रेल्वे गार्डला रेल्वे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. 


संपूर्ण प्रकार

मंगळवारी सकाळी १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी बेलापूरहून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होती. दरम्यान मुलगी घणसोली स्थानकावर उतरल्यानंतर फलाटाहून जात असताना लोकलच्या सर्वात शेवटच्या डब्यात उभा असलेला रेल्वे गार्ड अमित सिन्हा (४१) याने रेल्वे डब्याच्या बाहेर उभे राहून आपलं गुप्तांग त्या तरुणीला दाखवत अश्लील चाळे करत होता. या प्रकाराने भेदरलेल्या पीडित तरुणीने तेथून पळ काढला. त्यावेळी तिथे इतर महिला प्रवासीही होत्या. काही तास संयम दाखवल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात केली.


अखेर गार्डला अटक

फिर्यादी महिलांनी दिलेल्या तक्रारीतील वर्णनानुसार आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी विविध पथके तयार केली. शिवाय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार अमित सिन्हाची ओळख पटवून पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक केली. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडीची शिक्षा सुनावल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.


हेही वाचा - 

धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक

अश्लील चाळे करणाऱ्याला तरुणीने शिकवला धडा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा