रिया चक्रवर्ती याचिका ईडीने फेटाळली, चौकशी आजच होणार

रियाने ९० दिवसात सुशांतच्या खात्यातून ३ कोटी रुपये खर्च केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी रिया विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर

रिया चक्रवर्ती याचिका ईडीने फेटाळली, चौकशी आजच होणार
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला कित्येक दिवस उलटूनही अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणात ईडीने फास आवळत रियाला ७ आँगस्ट म्हणजेच आज चौकशीसाठी बोलावले होते. मात्र रियाने चौकशी पुढे ढकलण्याबाबत अर्ज केला होता. मात्र ईडीने रियाची याचिका फेटाळून लवत तिला आजच चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार रिया १२ वा .चौकशीसाठी हजर राहिली. रियाने ९० दिवसात सुशांतच्या खात्यातून ३ कोटी रुपये खर्च केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी रिया विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर, या आत्महत्येच्या तपासावरून मुंबई आणि बिहार पोलिस ही एकमेकांसमोर आले होते. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

हेही वाचाः- Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत, सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिस मुख्य आरोपीला सोडून, नको त्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलवत असल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची दिशाच बदलली. या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. ज्यावेळी त्यांनी या प्रकणाचा तपास सुरू केला. त्या दिवसापासून ते स्वतंत्र तपास करत आहेत. बिहार पोलिसांनी प्रथम सुशांतच्या बँकेती व्यवहारांवर लक्ष केंद्रीत करत, बँकेतून सुशांतच्या खात्यावरून वळवण्यात आलेल्या पैशांची माहिती जमा केली. आत्महत्येच्या दिवशी घरात उपस्थितांकडे चौकशी केली. त्यातून रियाने सुशांतच्या बँकेतील खात्यातून ९० दिवसात तब्बल ३ कोटी रुपये खर्च केल्याचे निदर्शनास आले. तसेच रियाने मागील काही वर्षात जी काही प्राँपर्टी खरेदी केली आहे. तिचा इन्कम सोर्स काय आहे. हे देखील ईडी पडताळणार आहे. या प्राँपर्टीसाठी रिच्या खात्यात पैसे वळते केले असतील. तर रियाच्या अडचणी वाढ होऊ शकते. वेळ प्रसंगी तिला अटकही होऊ शकते.

हेही वाचाः- आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

या आत्महत्या प्रकरणामागे आर्थिक व्यवहाराचा संशय करत पुढे ईडीने उडी घेतली. त्यानुसार सुशांतच्या बँक खात्यातून रियाने वळवलेल्या पैशांची चौकशी करण्यासाठी ईडीने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावला होता. ईडीने रियाला ७ आँगस्टला चौकशीस हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र रियाने याचिका दाखल करत चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र संशयित आरोपींना अशा प्रकारे सूट दिल्यास इतर गुन्ह्यातील आरोपीही अशी पळ वाट काढतील. तसे होऊ नये म्हणून आणि सभोवतालची परिस्थिती आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ईडीने रियाची याचिका फेटाळून लावली. तसेच तिला आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रिया दुपारी १२ वा. चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहिली. त्यावेळी तिने माध्यमांशी बोलणे टाळले.  



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा