सुशांत प्रकरणात बदनामी करणाऱ्यांना रिया खेचणार कोर्टात

बदनामी करणारे माध्यमं आणि डिंपल थावणीला रिया आता कोर्टात खेचणार असल्याचे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.

सुशांत प्रकरणात बदनामी करणाऱ्यांना रिया खेचणार कोर्टात
SHARES

बहुचर्चित सुशांत आत्महत्या प्रकऱणात रिया चक्रवर्तीला एनसीबीने जामीनावर मुक्तता केली. रियाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. मात्र या केसमध्ये काही माध्यमांकडून रियाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप रियाने केला आहे. बदनामी करणारे माध्यमं आणि डिंपल थावणीला रिया आता कोर्टात खेचणार असल्याचे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.

हेही वाचाः- अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या प्रकरणात काही माध्यमांनी जाणीवपूर्वक मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप होत असताना. यात रिया चक्रवर्तीनेही उडी घेतली आहे. काही माध्यमांनी रियाची जाणीवर पूर्वक बदनामी केल्याचा आरोप रियाने केला आहे. तर माध्यमांना चुकीची माहीती देत बदनामी करणाऱ्या डिंपल थावणी विरोधात रियाने सीबीआयसह न्यायालयात धाव घेतली आहे. डिंपलने माध्यमांना जे स्टेटमेंट दिलं होतं, त्यानुसार सीबीआयने तिची चौकशी केली असता. सीबीआयला देण्यात आलेल्या जबाबात तिने स्वतःच स्टेटमेंट बदललं असा आरोप रियाने केला. त्यामुळे डिंपलने जाणीव पूर्वक बदनामी केल्याचा आरोप रियाने केल्याचे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.

हेही वाचाः- MPSC परीक्षा पुढे ढकलताना फक्त एकाच जातीचा विचार, बाकीच्याचं काय?- प्रकाश आंबेडकर

या विरोधात रियाने सीबीआयचे  एसपी नूपूर प्रसाद यांच्याकडे डिंपल थावणी विरोधात लेखी तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल १ लाख बनावट अकाऊन्टचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी दिली आहे. यात प्रामुख्याने ५ ते ७ बाँट अँप्लिकेशनचा वापर करण्यात आला आहे. या अँप्लिकेशनच्या मदतीने एकावेळी ५ ते १० हजार अकाऊन्ट कंट्रोल केली जाऊ शकतात.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा