पोलिस ठाण्याबाहेरील बेवारस गाड्या हटवणार

या संस्थेने नाशिकमधील तब्बल २ हजार गाड्या हटवल्या होत्या. या स्वयंसेवी संस्थेला या कामाचा दांडगा अनुभव आहे.

पोलिस ठाण्याबाहेरील बेवारस गाड्या हटवणार
SHARES

मुंबईच्या पोलिस ठाण्याबाहेर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या गाड्या वर्षानुवर्ष रस्त्यावरील जागा अडवून पडलेल्या आहेत. पोलिस ठाण्याबाहेरील भंगार गाड्याचा प्रश्न हा गहन झाला होता. या बेवारस गाड्या आता हटवल्या जाणार आहेत. पुण्यातील एका स्वयंसेवी संस्था गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने हे काम केले जाणार आहे. नुकतीच या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

हेही वाचाः- मुख्यमंत्री बदलला की जागेची मालकी बदलते का?, महापौरांचा सवाल

नाशिकमध्ये ज्या वेळी अशा भंगार गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी या संस्थेने नाशिकमधील तब्बल २ हजार गाड्या हटवल्या होत्या. या स्वयंसेवी संस्थेला या कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी नाशिकमध्ये दोन हजार वाहने हटवली आहेत. ही संस्था वाहन क्रमांकावरून त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचते. त्यानंतर या वाहनांचा ताबा घेण्याची विनंती करण्यात येते. पण बहुधा गाडीचे कागदपत्र अथवा इतर कारणांमुळे मालक वाहनांचा ताबा घेण्यास गैरहजेरी लावतात. वारंवार सांगूनही वाहनाचा ताबा न घेतल्यास अखेर न्यायालयाच्या परवानगीने पोलिस अशा वाहनांचा लिलाव करतात.

हेही वाचाः- २४ तासांच्या आत महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याचे आदेश

ही स्वयंसेवी संस्था अशा मालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेते. त्यानंतरही ते गाडीचा ताबा घेण्यास पुढे आली नाही. तर ते वाहन भंगारात काढण्याबाबत मालकाचे संमत्ती पत्र घेतले जाते. ती रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाते. मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान ५० तरी अशी वाहने धूळखात पडलेली आहेत.या संस्थेमार्फत आता मुंबईतील विविध पोलिस ठाण्यातील वाहनांचा सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. त्याची सुरूवात निर्मल नगर पोलिस ठाण्यापासून करण्यात आली आहे. यापूर्वी या संस्थेने पुणे व कोल्हापूर पोलिसांनीही अशा पद्धतीने मदत केली आहे. तेथील ७ हजार वाहने या संस्थेमार्फत हटवून पोलिस ठाण्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच अनेक मालकांनाही त्यांची वाहनेही परत करण्यात मदत करण्यात आली आहेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा