आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थड रोड तुरुंगात

आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी आहे.

आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थड रोड तुरुंगात
SHARES

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला आहे.

आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी आहे. सुनावणीआधी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं. शाहरुख एकटा आतमध्ये गेला असून यावेळी गौरी खान सोबत नाही आहे.

२ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटत आहे.

बुधवारी न्यायालयानं जामीन नाकारताना आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही.

शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेनं दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचं कबूल केलं होतं. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयानं म्हटलं होतं.

दरम्यान, बुधवारच्या सुनावणीत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत. अशी माहिती एएनआय या वृत्त संस्थेनं दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, NCBच्या हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. सुनावणीदरम्यान एनसीबीनं ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले.

असंही म्हटलं जात आहे की, ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीनं तिला सोडून दिलं होतं. येत्या काळात या अभिनेत्रीची एनसीबी टीमकडून चौकशी केली जाऊ शकते. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

याशिवाय, जामिनावरील सुनावणीपूर्वी काही ड्रग पॅडलरसोबतचे आर्यनचे चॅटदेखील न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.


हेही वाचा

जामीन फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उचललं 'हे' पाऊल

मुंबईतील सायन परिसरातून २१ कोटींचे ड्रग्ज जप्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा