महिलेची छेड काढणाऱ्या ओला कॅब चालकाला अटक

 Dadar
महिलेची छेड काढणाऱ्या ओला कॅब चालकाला अटक
Dadar , Mumbai  -  

महिलेची छेड काढणाऱ्या ओला कॅब चालकाला मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अटक केली आहे. त्यानंतर त्याला भोईवाडा न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मरोळहून परळला जाण्यासाठी पीडित महिलेने मंगळवारी दुपारी ओला कॅब बुक केली होती. त्यावेळी तिच्यासोबत आणखी एक प्रवासी देखील होता. काही वेळानंतर हा प्रवासी गाडीतून उतरला. त्यानंतर गाडी शिवाजी पार्कला पोहोचताच ओला कॅब चालकाचे या महिलेसमोर अश्लील चाळे केले. ते पाहून या महिलेने शिवाजी पार्क पोलिसांना संपर्क करून तक्रार नोंदवली.

पीडित महिलेची तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 354 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करत मंगळवारी संध्याकाळी त्याला अटक केली.


हेही वाचा -

महिलांनो..रेल्वेतून प्रवास करताना काळजी घ्या!

4जी गाडीमुळे सापडला 'तो' विकृत!

Loading Comments