4जी गाडीमुळे सापडला 'तो' विकृत!


4जी गाडीमुळे सापडला 'तो' विकृत!
SHARES

गुरुवारी खार-वांद्रे परिसरातल्या महिलांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून चॉकलेटी रंगाच्या अॅक्टिव्हावरुन या परिसरातल्या महिलांवर हात टाकणाऱ्या एका विकृताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जिब्रन शफी सय्यद असे या विकृताचे नाव असून तो 28 वर्षंचा आहे. तब्बल 20 महिलांसोबत गैरकृत्य केल्याची कबुली जिब्रनने दिली आहे. गंभीर बाब म्हणजे जिब्रनवर बलात्काराचा गुन्हादेखील दाखल आहे.

गेल्या काही महिन्यांपासून खार वांद्रे परिसरात रहाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होत. चॉकलेटी रंगाच्या अॅक्टिव्हावरून फिरणारा एक विकृत एकट्या महिलेला छेडत असे, किंबहुना आसपास वर्दळ नसल्याचा फायदा घेऊन हा विकृत महिलेवर चक्क हात टाकत असे. विशेष म्हणजे महिलेकडे कोणतीही मौल्यवान वस्तू तोच चोरत नसे. यावरुन त्याचा नक्की उद्देश काय हे पोलिसांना कळून चुकले होते. पोलिस त्याला शोधत होते. या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळालं होतं. पण काही केल्या जिब्रन त्यांना सापडत नव्हता. त्याच्या अॅक्टिव्हा गाडीवर नंबरदेखील नसल्याने पोलीस पुरते हतबल झाले होते. अखेर गुन्हे शाखेने मोर्चा सांभाळला.


4जी अॅक्टिव्हामुळे सापडला जिब्रन

जिब्रन वापरत असलेल्या अॅक्टिव्हावर नंबर नव्हता. कारण त्याने ही गाडी रजिस्टरच केली नव्हती. पण या गाडीवरचा दिवा सतत सुरुच असतो हे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरुन समजलं. नव्या 4जी टेक्नोलॉजीच्या अॅक्टिव्हा गाड्यांचे दिवे अशा प्रकारे दिवसाही सुरुच असतात. त्यावरुन पोलिसांनी आरटीओकडून मागवलेल्या माहितीनुसार मुंबईत 2 हजार पाचशे अशा 4जी अॅक्टिव्हा गाड्या सापडल्या. आणि त्यातल्या तब्बल 900 गाड्या या खार-वांद्रे परिसरातल्या होत्या.

याच माहितीच्या आधारावर अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना जिब्रनच्या ठावठिकाण्याबाबत टिप मिळाली. गुन्हे शाखा कक्ष 9 चे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार असा इसन कार्टर रोड परिसरात रहात असल्याचं कळलं. परिसरात चौकशी करण्यासाठी पोलिस गेले असता त्यांना अशीच अॅक्टिव्हा घेऊन जात असलेला बाईकस्वार दिसला. पोलिस दिसताच हा बाईकस्वार पळू लागला, तेव्हा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं. तो जिब्रनच असल्याचं समोर आलं.


20 महिलांवर टाकला हात

खारमध्ये जिब्रनवर असे दोन गुन्हे दाखल होते, तर वांद्र्यात गेल्या वर्षी असा एक गुन्हा नोंद होता. मात्र, या नराधमाने तब्बल २० महिलांवर हात टाकल्याची कबुलीच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान दिली आहे. कित्येक प्रकरणांत अब्रू जाईल या भीतीने महिला पुढे न आल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी पोलिसांनी दिली. तसेच, अशा स्वरूपाची घटना कोणत्या महिलेसोबत घडली असेल तर त्याची तात्काळ तक्रार दाखल करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा

महिलांचा विनयभंग करणारी 'अॅक्टिव्हा गँग' मुंबईत सक्रिय


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा