छोटा शकीलच्या हस्तकाने मागितली बिल्डरकडून खंडणी

  Mumbai
  छोटा शकीलच्या हस्तकाने मागितली बिल्डरकडून खंडणी
  मुंबई  -  

  जुहू येथील बांधकाम व्यावसायिक म्हणजेच एका बिल्डराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाने मिळालेल्या धमकीने खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण छोटा शकीलचा हस्तक असल्याची बतावणी करत व्यावसायिकाकडून 10 कोटींची खंडणी मागितली होती, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे. +3444 नंबरवरून आलेला हा फोन स्पेनमधून करण्यात आल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.


  खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

  27 जुलैला हा व्यावसायिक आपल्या जुहू येथील कार्यालयात होते. तेव्हा +3444 नंबर वरून पहिल्यांदाच फोन आला. या कॉलरने आपली ओळख फहिम अशी करून देत आपण छोटा शकीलतर्फे बोलत असून व्यवसाय चांगला सुरू आहे ना? असे विचारत त्या फहिमने 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली. 

  एवढ्यावरच न थांबता, खंडणी दिली नाही तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी देत फहिमने फोन कट केला. व्यावसायिकाने याकडे दुर्लक्ष केले. पण, 31 तारखेला पुन्हा त्याच नंबरवरून फहिमचा फोन आला. यावेळी देखील त्याने धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली. शेवटी, जुहू पोलिस ठाण्यात जाऊन व्यावसायिकाने फहिम नावाच्या व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला.

  'या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची' माहिती सांताक्रूझ विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांनी दिली. सध्या जुहू पोलिसांसह गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.  हेही वाचा -

  अंडरवर्ल्डमध्ये छोटा, टकल्या आणि मचमच

  मंत्र्यांच्या घरूनच आला त्याला खंडणीचा फोन


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.