आणि रिया अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली

रविवारी तब्बल ६ तास रियाची चौकशी करण्यात आली. एनसीबीने केलेल्या चौकशीत रिया चक्रवर्ती ढसाढसा रडली आणि आपण ड्रग्स मागवले असल्याची कबुली दिल्याचे कळते.

आणि रिया अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी चौकशीला वेग आला आहे. आज दुसऱ्या दिवशीही रिया चक्रवर्तीही एनसीबीच्या कार्यालयात सकाळीच चौकशीसाठी हजर राहिली आहे. रविवारी तब्बल ६ तास रियाची चौकशी करण्यात आली. एनसीबीने केलेल्या चौकशीत रिया चक्रवर्ती ढसाढसा रडली आणि आपण ड्रग्स मागवले असल्याची कबुली दिल्याचे कळते.

हेही वाचाः- राज ठाकरे आणि कुटुंबियांचे सोशल मिडियावर बनावट अकाउंट, शिवाजी पार्क पोलिसात तक्रार

रिया चक्रवर्तीची रविवारी अंमली पदार्थ विरोधी पथक  ने चौकशी केली होती. या चौकशीत रिया आणि तिचा भाऊ शौविक या दोघांची समोरसमोर बसून चौकशी केली. यावेळी रियाला रडू फुटले. त्यानंतर रियाची स्वतंत्र्य ६  तास चौकशी करण्यात आली होती. यात रियाला ६० ते ७० प्रश्न विचारण्यात आले. यातील अनेक प्रश्नांची उत्तर रियाने दिली. मात्र एनसीबीसाठी ती असमाधानकारक होती. तब्बल ६ तासाच्या चौकशीनंतर  रियाला सोडण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने मान्य केले की, मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये दिपेशकडून ड्रग्स मागवले होते. परंतु, आपण ड्रग्स घेतले नसल्याचे रियाने स्पष्ट केले. त्याचबरोबर या प्रकरणात अटकेत असलेल्या मिरांडा आणि रियाची समोरासमोर चौकशी केली. यावेळीही रियाला तू ड्रग्स घेतले का? असे प्रश्न विचारले होते. पण, रियाने पुन्हा एकदा आपण ड्रग्स नाही परंतु, आपण सिगारेट ओढत असल्याचे सांगितले.रियाने हे ही कबुल केले की, ड्रग्स डिलर बासिद परिहारशी पाच वेळा भेटली होती. त्याची भेटही सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झाली होती. सुशांत नैराश्यग्रस्त झाला होता. त्याचा अलीकडेच एक सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यानच सुशांत ड्रग्स घेत होता, अशी माहितीही रियाने दिली.

हेही वाचाः- धोका वाढला! महाराष्ट्रात दिवसभरात सर्वोच्च २३,३५० नव्या रुग्णांची नोंद, ३२८ जणांचा मृत्यू

यावेळी रियाने आणखी एका मोठ्या व्यक्तीच्या उल्लेख केला आहे. पण, एनसीबी या व्यक्तीचे नाव सांगण्यास मनाई केली आहे. सुशांत हा ड्रग्सच्या आहारी गेला होता. आम्ही जेव्हा युरोप फिरण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सुशांतने ही टूर अर्धवट सोडून दिली होती. कारण, या टूरमध्ये सुशांतला कुठे ड्रग्स मिळत नव्हते, असंही रियाने सांगितले. सुशांतच्या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्या होत होत्या. यावेळी बरेच जण हे ड्रग्स घेत होते. या पार्ट्यांमध्ये छोट्या कलाकारांपासून ते मोठे कलाकारही या पार्टीत येत होते. सर्वच जण ड्रग्स घेत होते, असंही रियाने सांगितलं. एनसीबी ने केलेल्या चौकशीमध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबाबद्दलही सांगणार आहे. त्यामुळे एनसीबी ने मुंबई पोलीस आणि सीबीआयला विनंती केली आहे की, सुशांतच्या घरातून ताब्यात घेतलेल्या साहित्याची तपासणी करण्यासाठी मागणी केली आहे. यात कुठे सीबीडी ऑइल सारखा पदार्थ कुठे आढळतो का ? हे एनसीबी ला पाहायचे आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा