राज ठाकरे आणि कुटुंबियांचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, शिवाजी पार्क पोलिसात तक्रार

नुसते राज ठाकरे यांचेचं नाही. तर राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे कन्या उर्वशी ठाकरे यांच्या नावानेही बनावट अकाऊन्ट सुरू करून कुणीतरी जाणीव पूर्वक खोडसाळपणा केल्याचे निदर्शनास आले आहे.

राज ठाकरे आणि कुटुंबियांचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, शिवाजी पार्क पोलिसात तक्रार
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वेळोवेळी मुंबई पोलिसांवर टिका करणाऱ्या कंगणा रणौतची बाजू मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत असल्याचे सोशल मिडिया दिसत होते. मात्र या सर्व अकाऊन्टची वस्तूस्थिती पडताळल्यानंतर नुसते राज ठाकरे यांचेचं नाही. तर राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे कन्या उर्वशी ठाकरे यांच्या नावानेही बनावट अकाऊन्ट सुरू करून कुणीतरी जाणीव पूर्वक खोडसाळपणा केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकऱणी मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.   


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यावरून सुरू झालेल्या राजकिय वादात कंगणा रणौतने उडी घेत, मुंबई पोलिसांवर टिका केली. त्यावर अनेक राजकिय पुढाऱ्यांनी कंगणाला खडेबोल सुनावल्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैकी सुरू झाल्या, ‘मुंबई पाकव्याप्त काश्मिरसाठी वाटते’ या कंगणाच्या वाक्यामुळे तिला सोशल मिडियावर सर्वांनीच चांगलेच ट्रोल केले. अशातच राज ठाकरे यांच्या नावाने असलेल्या ट्विटर हॅडलवरून ते कंगणाच्याबाजून उभे असल्याचे मेसेज अपलोड झाल्याने एकच खळबळ उडाली. राज ठाकरे यांच्या या ट्विटर अकाउंटवरून संजय राऊत यांना सुनावण्यात आले आहे. शिवाय, शर्मिला ठाकरे यांच्या नावे असलेल्या अकाउन्टवरूनही 'कंगना मेरी बेटी है' असे ट्विट करण्यात आले आहे. मात्र वस्तूस्थिती पडताळल्यानंतर हे दोन्ही अकाउन्ट हे फेक असल्याचे पुढे आले.

मनसैनिकांनी केलेल्या पडताळणीत नुसते राज यांचेचं नाही. तर राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे या सर्वांच्या नावाने बोगस अकाउन्ट उघडण्यात आली होती. यावरून कुणीतरी जाणीव पूर्वक खोडसाळपणा करण्यासाठी हे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनसेचे  सचिव सचिन मोरे यांनी शिवाजी पार्क पोलिसात तक्रार नोंदवत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचाः- IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नईत ‘या’ दिवशी ओपनिंग मॅच

हेही वाचाः- मुलुंडमधील मसाले व्यापाऱ्याच्या मुलाचे सिनेस्टाइल अपहरण, पुण्यातून चौघांना अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा