Advertisement

कंगनासोबत माझं व्यक्तीगत भांडण नाही, पण..., संजय राऊत पुन्हा बोलले

मी फक्त माझ्या पक्षाची भूमिका मांडली, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनासोबतच्या वादावर भाष्य केलं.

कंगनासोबत माझं व्यक्तीगत भांडण नाही, पण..., संजय राऊत पुन्हा बोलले
SHARES

अभिनेत्री कंगना राणावत हिच्यासोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही. परंतु तिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्र, मुंबईबद्दल कोणी असं गंभीर वक्तव्य करत असेल तर तो केवळ एखाद्या पक्षाचा विषय राहत नाही. तर तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय होतो. मी फक्त माझ्या पक्षाची भूमिका मांडली, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनासोबतच्या वादावर भाष्य केलं. (shiv sena mp sanjay raut clarifies on disputes with actress kangana ranaut)

 मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती घाणेरड्या शब्दांत बोलत असेल तर हा विषय एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा राहत नाही. तर हा महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा विषय होतो. जे जे महाराष्ट्राचं खातात, पितात. इथं राहतात त्यांचा हा विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा- आमचे पाेलीस काय तो निर्णय घेतील, गृहमंत्र्यांचं कंगनाबाबत वक्तव्य

महाराष्ट्र, मुंबई ही केवळ शिवसेनेची आहे का? तर ती मराठी माणसाची आहे. महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या प्रत्येकाची ती आहे. कंगनाच्या वक्तव्याचा निषेध सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही तिला समज दिली आहे. फक्त शेलार यांनी हीच गोष्ट जोरात बोलायला हवी. कारण, महाराष्ट्र त्यांचाही आहे. तेही महाराष्ट्रात राजकारण करतात. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील कंगनाला सुनावलं. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हे देखील शुक्रवारी बोलले. तसाच मीदेखील माझ्या पक्षाच्यावतीनं जे काही बोलायचं ते बोललो.

बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांनीही याबद्दल आपली भूमिका मांडलीय, त्यांचं मी अभिनंदन करतो. आता जे काही करायचं ते सरकार करेल. त्यामुळे आता हा विषय संपवायला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे. तसंच मला मुंबईत येऊ नये असंही बजावलं आहे. मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असं वक्तव्य कंगनाने केल्यानंतर शिवसैनिक खवळले होते. ठाण्यातील महिला शिवसैनिकांनी कंगनाचा फोटो जाळून आंदोलन केलं.

हेही वाचा- मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, राऊतांनी कंगनाला ठणकावलं...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा