ठाणे-कळव्यामध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक, प्रवासी गंभीर जखमी

याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दगड भिरकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

ठाणे-कळव्यामध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक, प्रवासी गंभीर जखमी
FILE PHOTO
SHARES

ठाण्याकडून कल्याणला जाणाऱ्या मध्य रेल्वेबाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या धीम्या गती मार्गावरील कल्याणकडे जाणाऱ्या लोकलवर अनोळखी व्यक्तीने दगड मारल्याने अनुचीत प्रकार घडला आहे. ही घटना सोमवारी रात्री कळवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेत कळव्यातील बालुदीन गुप्ता (50) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या नाकाला जबर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दगड भिरकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. 

ठाण्याकडे कल्याणच्या दिशेला चाललेल्या संत गतीने जाणाऱ्या लोकलवर कळवा रेल्वे स्थानकादरम्यान एका अज्ञाताने मुद्दाम दगड फेकल्याने एक गंभीर जखमी झाला. यामध्ये कळवा रेल्वे स्थानकात उतरण्यासाठी दरवाज्यात उभे असणारे कळवा पूर्व शांतीनगर येथील बालुदीन गुप्ता (50) यांच्या नाकाला दगड लागल्याने जखमी झाले.

गुप्ता यांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गुप्ता यांच्या दगडाचा मार नाकावर लागल्याने नाकाचे हाड तुटले आहे. त्यांना उपचारासाठी नेले असता त्यांच्यावर उपचार वेळेत न झाल्याने प्रवाशाच्या नाकातून भरपूर रक्त गेल्याचे बोलले जात आहे. डॅाक्टर उपलब्ध नसल्याने मलम पट्टी करुन प्रवाशाला घरी पाठवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर सगळ्यांनीच आक्षेप घेतला.

दरम्यान या घटनेचा दुजारो देताना, नेमके कशामुळे दुखापत झाली हे स्पष्ट झाले नाही. पण, दगड फेकल्याची शक्यता असल्याने दगड फेकणाऱ्या अज्ञात वक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती ठाणे लोहमार्गाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.



हेही वाचा

तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टा डोम कोच जोडला जाणार

रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास हो़णार सुखकर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा