चोरी करायला गेलेला चोर पियाला दारू, तुरुंगात उघडला डोळा

दारूची नशा एका चोराला चांगलीच भारी पडली. चोरी करायला गेला. पण दारूच्या लालसेपोटी त्याला गाठावा लागला तुरुंग...

चोरी करायला गेलेला चोर पियाला दारू, तुरुंगात उघडला डोळा
SHARES

दारूची नशा एका चोराला चांगलीच भारी पडली. गेला चोरी करायला. पण दारूच्या लालसेपोटी त्याला गाठावा लागला तुरुंग... तुम्ही कधी ऐकलं किंवा वाचलं नसेल अशी एक घटना समोर आली आहे. चोरी करायला गेलेला चोर दारू पिऊन त्याच घरात झोपला. जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा तो तुरुंगात होता. ही मजेशीर घटना मरीन ड्राइव्ह इथं घडली आहे


काय प्रकरण आहे?

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, मुंबई सेंट्रलमध्ये राहणारा १९ वर्षीय संजीव वर्मा बुधवारी रात्री मरीन ड्राईव्ह परिसरात चोरी करण्यासाठी गेला होता. तो चोरी करण्यासाठी एका व्यावसायिकाच्या घरात शिरला. गिरीकुंज इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर या व्यावसायिकाचं घर आहे. कसा तरी त्यानं व्यावसायिकेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तो किंमती सामानाचा शोध घेऊ लागला. तेव्हा त्यानं तिथं ठेवलेला फ्रिज उघडला. फ्रिजमध्ये त्याला शॅपेनच्या २ बाटल्या सापडल्या.


दारूची लालच पडली महागात

शॅम्पेन पाहिल्यावर संजीवला लालच आलं. त्यानं शॅम्पेनची पूर्ण एक बॉटल खाली केली. फक्त एवढ्यावर तो थांबला नाही. तर शॅम्पेनची दुसरी बॉटल देखील त्यानं अर्धी फस्त केली. पण थोड्या वेळानं त्याला दारु चढली. तो इतका नशेत होता की तो त्याच घरात बेशुद्ध पडला

संजीव ज्या घरात चोरी करायला गेला होता ते घर व्यावसायिक सिद्धांत साबू यांचं होतं. सिद्धांत साबू इमारतीच्या त्याच मजल्याच्या दुसर्‍या फ्लॅटमध्ये राहत होते. थोड्या वेळानं जेव्हा सिद्धांत साबू घराबाहेर पडला तेव्हा त्यानं आपल्या घराचा दिवा जळताना पाहिला. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून लॉक असल्याचं त्यानं कळालं. सिंद्धांत साबूनं तिथं आणखी लोकांना बोलावलं आणि सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. ते आत गेले तेव्हा संजीव पडलेला आढळला. संजीवला पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं

खावी लागतेय तुरुंगाची हवा

पोलिसांनी जेव्हा घराची तपासणी केली तेव्हा त्यांना कचऱ्याच्या डब्यात शॅम्पेनची रिकामी बाटली आणि फ्रिजमध्ये शॅम्पेनची अर्धी बाटली सापडली. यानंतर पोलिसांनी संजीवला अटक केली. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणलं. साबू म्हणाले की, नुकताच मी हा फ्लॅट खरेदी केला आहे. त्यामुळे त्यानं या फ्लॅटमध्ये कमी वस्तू ठेवल्या आहेत

याबाबत पोलिसांनी संजीवला विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की, चोरी करण्यासाठी तो फ्लॅटमध्ये गेला होता. परंतु दारू प्यायल्यानंतर तो नशेत बेहोश झाला. मात्र, तिथून त्यानं कोणतीही चोरी केली नसल्याचं सांगितलंहेही वाचा

कुलाब्यातून ४ अफगाणींना अटक

गौतम नवलखा, तेलतुंबडे यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा