चोरांनी फोडल्या मॅरेथाॅन स्पर्धकांच्या गाड्या


चोरांनी फोडल्या मॅरेथाॅन स्पर्धकांच्या गाड्या
SHARES

पवई आयआयटीत हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या १२ गाड्यांच्या काचा चोरांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मुंबईतील पवई आयआयटी कॅम्पसमध्ये या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस हा प्रकार घडल्याचं समजतं आहे.


पोलिसांत तक्रार

चोरांनी गाड्यांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान वस्तूंसह लॅपटॉप लंपास केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस चोरांचा तपास करत आहेत.


कधी घडली घटना?

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींची नावं अद्याप समजलेली नाही. रविवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या मॅरेथॉन स्पर्धकांनी त्यांच्या गाड्या पवई आयआयटी परिसरात पार्क केल्या होत्या. त्यावेळी संधी साधून येथील चोरांनी त्यांच्या पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या आणि गाडीतील मौल्यवान वस्तू, लॅपटॉप, मोबाईल आणि बॅग यांसारख्या महागड्या वस्तू लंपास केल्या.

या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा-

विवाहितेची सोशल मीडियावर बदनामी; तरूणाला दिल्लीतून अटक

नालासोपारा स्फोटकप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा