बँकेतील महिलाच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात, १ लाखाला गंडवलं


बँकेतील महिलाच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात, १ लाखाला गंडवलं
SHARES

ओटीपी नंबर मिळवत सायबर चोरट्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांना अनेकांना गंडवलं अाहे. अशा प्रकारच्या फसवणूकीच्या घटनांनंतर बँकांकडून अापल्या ग्राहकांना खबरदारीचा सल्ला घेण्याचं आवाहन केलं जात अाहे. मात्र, प्रभादेवी येथे बँकेत काम करणाऱ्या एका महिलेलाच या सायबर चोरट्यांनी आपल्या जाळ्यात ओढत एक लाख रुपयांना गंडवलं अाहे. 

क्रेडीट कार्ड व्हेफिकेशनच्या नावाखाली ओटीपी नंबर मिळवत चोरट्यांनी या महिलेला फसवलं. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


व्हेरिफिकेशनच्या नावाखाली फसवलं

माटुंगाच्या हिंदू काॅलनी परिसरात चंद्रशेखर आनंद गद्रे (५३) हे पत्नी शीतल चंद्रशेखर गद्रे (४९) आणि मुलासोबत राहतात. चंद्रशेखर हे महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळात नोकरी करतात. तर त्यांची पत्नी शितल या प्रभादेवी येथील नामांकीत बँकेत नोकरी करतात. शितल यांचे स्टेट बँक आॅफ इंडियात खातं आहे. २९ जून रोजी शितल यांच्या मोबाइलवर अनोळखी नंंबरहून दुपारी १ वाजता फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने शीतल यांना आपण स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचं सांगितलं.

कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी फोन केला असल्याचं सांगून ते न केल्यास कार्ड बंद होईल असं सांगितलं. त्या भितीने शीतल यांनी समोरील व्यक्तीला कार्ड नंबर दिला. तसंच शीतल यांनी त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी नंबरही दिला. त्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास शीतल यांच्या मोबाइलवर खात्यातून पैसे काढल्याचे पाच मेसेज अाले. त्यांच्या खात्यातून १ लाख ५ हजार रुपये काढण्यात अाले होते.


३७ हजारांचा व्यवहार थांबला

शीतल यांनी त्यांना अालेल्या फोनवर काॅल केला असता तो फोन बंद येत होता. वेळ न दवडता शीतल यांनी त्यांचे कार्ड अाॅनलाईन ब्लाॅक केले. त्यामुळे त्यांच्या खात्यातून होणारा ३७ हजार रुपयांचा व्यवहार थांबला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शीतल यांनी माटुंगा पोलिसात तक्रार नोंदवली.



हेही वाचा -

प्रवेशाच्या नावाखाली २० लाखांचा गंडा

धक्कादायक! मुंबईत मुलींच्या अपहरणात वाढ 




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा