‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास अटक

देखील मातोश्रीवर फोन करून उद्धव ठाकरे यांना धमकावणाऱ्यास दया नायक यांच्या पथकाने कोलकत्ता येथून अटक केली होती.

‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास अटक
SHARES

 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस एन्काऊटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या पथकाने राजस्थानमधून अटक केली आहे. यापूर्वी देखील मातोश्रीवर फोन करून उद्धव ठाकरे यांना धमकावणाऱ्यास दया नायक यांच्या पथकाने कोलकत्ता येथून अटक केली होती.

हेही वाचाः- सुशांत सिंह प्रकरण: एम्सच्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं- काँग्रेस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. 'मातोश्री' बंगला उडवून देण्याची धमकी ३० ऑगस्टला आली होती. त्यानंतर 'वर्षा' बंगला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. तर शरद पवार यांच्या सिल्वर ओक आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक कामाला लागले. एका मागून एक राजकिय पुढाऱ्यांना आलेल्या धमकीच्या फोनने एकच खळबळ उडाली. धमकी देणाऱ्याने दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकी, अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या रायगडमधील फार्म हाऊसची काही अज्ञातांनी रेकी केली होती.

हेही वाचाः- नो मास्क, नो इंन्ट्री! मास्‍क नसल्‍यास ‘बेस्‍ट बस’ सह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश नाही

धमकीचे हे फोन दुबईच्या नंबरहून मातोश्रीवर तीन ते चार वेळा आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत, पोलिसांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ केली. अखेर दहशतवाद विरोधी पथकाने या नंबरचा माग शोधून काढत आरोपीला राजस्थानहून अटक केली आहे.  मात्र याबाबत अद्याप अधिकृत रित्या कोणतिही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा