रस्त्यावर बोलत थांबू नका, तुमच्या जीवाला धोका आहे!


रस्त्यावर बोलत थांबू नका, तुमच्या जीवाला धोका आहे!
SHARES

काही जण अगदी दुचाकी थांबवून रस्त्यावर बोलत उभे राहतात. कुठे तुम्ही तर असे करत नाही ना. असे करत असाल तर सांभाळून. 

कारण अशाच प्रकारे रस्त्यावर बाईक उभी करून तिघे जण बोलत होते. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांच्यातील दोघांचा मृत्यू आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. वडाळातल्या भक्ती पार्क सर्कलजवळ बुधवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. 


ट्रकच्या धडकेत दोन ठार

बुधवारी संध्याकाळच्या वेळी विनायक ढागे, विल्सम जोसेफ, सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण हे चौघेही मराठा मोर्चा संपल्यानंतर सीएसटीहून बाईकवरून त्यांच्या घरी जात होते.

सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण हे दोघेही एका बाईकवरून घरी जात होते. तर दुसरीकडे विनायक आणि विल्सन जोसेफ हे दोघेही भक्ती पार्कहून आयमॅक्स थियेटरच्या दिशेने जात होते. भक्ती पार्कच्या मोनो रेल्वे स्थानकावर त्यांनी बाईक थांबवली. त्याचवेळी विनायकने आपली बाईक दुसरीकडे वळवून तो सिद्धेश मारे आणि सिद्धेश चव्हाण यांच्याशी बोलू लागला. पण अचानक त्यांच्या मागून भरधाव वेगात असलेल्या ट्रकने विनायक, सिद्धेश आणि सिद्देश चव्हाण यांना उडवून ट्रक सरळ डिव्हायडरला जाऊन धडकली.

या अपघातात विनायक जागीच ठार झाला. त्याचवेळी सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले. तिथल्या स्थानिकांनी ते पाहिल्यानंतर त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. पण यामध्ये सिद्धेश मासेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.



'एमएमआरडीएने खणलेल्या खड्ड्यांमुळेच अपघात'

भक्ती पार्कजवळ स्पीड ब्रेकर नसल्याने आणि मोनो रेलसाठी एमएमआरडीएने खणलेल्या खड्ड्यांमुळेच अपघात होतात. पण त्याकडे कुणीही लक्ष देत नाही असा आरोप मृत विनायक यांच्या कुटुंबियांनी केला आहे.  त्यामुळे ट्रकचालकाला अटक व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरोधात भादंवि कलम 304(अ), 338, 279 आणि 184 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.



हेही वाचा - 

अपघात बघायला रस्त्यावर थांबू नका; तुमचाही अपघात होईल!

डंपर चालकाने महिलेला चिरडले



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा