अवघ्या ३ हजारांसाठी त्याने मित्राचा चाकू भोसकून खून केला

सबीर शेख यांच्याकडून ३ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र कित्येक महिने झाले तरी नकी पैसे परत करत नव्हता. पैसे मागितल्यावर नकी उडवा उडवीची उत्तरे देत होता.

अवघ्या ३ हजारांसाठी त्याने मित्राचा चाकू भोसकून खून केला
SHARES

मुंबईच्या अॅण्टाॅप हिल परिसरात मित्राने  उसने घेतलेले ३ हजार रुपये परत न केल्याच्या वादातून भररस्त्यात मित्राची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. नकी सईद खान (१९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येनंतर परिसरात भितीचे वातवरण पसरले आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीला थांबवण्यासाठी पुढे सरसावलेल्या मृताच्या भावावरही आरोपीने जिवघेणा हल्ला केला. मात्र सुदैवाने तो या हल्यात बचावला आहे. या प्रकरणी अॅण्टाॅप हिल पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  

हेही वाचाः- सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती एनसीबीच्या ताब्यात

मुंबईच्या अॅण्टाॅप हिल परिसरात नकी सईद खान हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. काही दिवसांपूवी त्याने सबीर शेख यांच्याकडून ३ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र कित्येक महिने झाले तरी नकी पैसे परत करत नव्हता. पैसे मागितल्यावर नकी उडवा उडवीची उत्तरे देत होता. यातूनच नकी आणि सबीर शेख यांच्यात वाद झाला होता. दरम्यान गुरूवारी रात्री ८ वा. नकी हा अँण्टाँप हिल येथील सारस्वत बँकच्या पदपथावरून भाऊ मुस्तकीम यांच्यासोबत जात होता. त्यावेळी सबीरने त्या दोघांची वाट अडवली. सबीरने नकीकडे पैशांची मागणी केली. मात्र नकीने नेहमी प्रमाणे  त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नकीला काही समजायच्या आतच सबीरने नकीवर चाकूने हल्ला केला. त्यावेळी नकीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या मुस्तकीम या त्याच्या  भावावर ही सबीरने हल्ला करून पळ काढला.

हेही वाचाः- शक्तीमिल गँगरेपमधील तडीपार आरोपीवर चाकूने हल्ला

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना स्थानिकांनी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचारा दरम्यान नकीचा मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषीत केले. तर मुस्तकीम याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अँण्टाँप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुस्तकीमने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वि अन्वेय गुन्हा दाखल केला. आरोपींबाबत असलेल्या तुटपूंज माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ८ तासात सबीरला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा