Advertisement

फक्त बांबूचा कंदील नव्हे, हा तर 'त्यां'च्या आयुष्यातला प्रकाश!

मोखाडामधल्या काही आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन बांबूपासून कंदील बनवण्याचा उपक्रम तडीस नेला. त्यांनी बनवलेल्या या कंदिलांनी मोठी मागणी येऊ लागली आहे.

SHARES

बांबूपासून बनवलेल्या अनेक वस्तू आपल्या आसपास, अगदी आपल्या घरातसुद्धा असतात. त्यातल्या अनेक वस्तू या आदिवासी बांधवांनी आपल्या हातांनी बनवलेल्या असतात. पण कित्येकदा त्यामागचे त्यांचे कष्ट आपल्या ध्यानातही येत नाहीत! ठाण्यातल्या मोखाडा भागात रहाणाऱ्या आदिवासी बांधवांनी यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्या घरी प्रकाश आणण्यासाठी खास हातांनी बनवलेले कंदील आणले आहेत. आणि कुणास ठाऊक, आपल्या घरातल्या प्रकाशाबरोबरच त्यांच्या घरातही या कंदिलांमुळे प्रकाश प्रवेश करेल!


या आदिवासी बांधवांनी खास बांबूपासून बनवलेल्या कंदिलांचं विशेष प्रदर्शन नुकतंच ठाण्यामध्ये भरवण्यात आलं होतं. यामध्ये त्यांच्या हाताच्या कौशल्यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकालाच आश्चर्य वाटत होतं. मोखाडमधल्या काही आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन कंदिल बनवण्याचा हा उपक्रम तडीस नेला. आणि त्यांनी बनवलेल्या या कंदिलांनी मोठी मागणी येऊ लागली आहे.


परिवर्तन महिला संस्थेच्या मदतीनं आम्हाला रोजगार उपलब्ध झाला. परिवर्तन महिला संस्थेतर्फे आयोजित बांबू प्रशिक्षणात आम्हाला अनेक वस्तू बनवायला शिकवलं गेलं. त्यापैकीच एक म्हणजे हे आकाश कंदील. या कंदिलांमुळे आमच्या आयुष्यातील अंधार दूर जाला आहे.

भगवान मोवळे, आदिवासी तरूण


'परिवर्तन महिला संस्था' या मोखाड इथल्या आदिवासी विभागात काम करणाऱ्या संस्थेने पुढाकार घेऊन तरुणांना बांबू प्रशिक्षण दिलं.


चार पाड्यातील तरूण एकत्र येत त्यांनी आमच्याकडे बांबू प्रशिक्षणाची मागणी केली. त्यासाठी मेळघाटातील तरूण बांबू प्रशिक्षण देण्यासाठी पाड्यात आले. या उपक्रमांतर्गत आम्ही हे कंदील बनवण्याचा विचार केला. आता या कंदिलांना प्रचंड मागणी आहे. पहिलाच प्रयत्न असल्यानं आम्ही ४൦൦-५൦൦ कंदिलांचीच ऑर्डर घेतली. पुढच्या वर्षी हा आकडा नक्कीच वाढलेला असेल!

वर्षा परचुरे, सदस्य, परिवर्तन महिला संस्था


फक्त कंदीलच नाही, तर बांबूपासून अनेक साहित्य हे तरूण बनवतात. यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी बांबूपासून कंदील बनवले आहेत!





हेही वाचा

'इथं' आहे फुलपाखरांचं रंगीबेरंगी विश्व!


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा