Advertisement

चिंचपोकळीच्या चिंतामणीची शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल


चिंचपोकळीच्या चिंतामणीची शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल
SHARES

गणेश चतुर्थीला आता फक्त ४७ दिवस उरले आहेत. त्यामुळं आता सर्वांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगानं घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. अशातच शनिवारी २९ जूलैला चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा म्हणजेच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा पार पडला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदाचं हे ९९ वं वर्ष असून पुढच्यावर्षी हे मंडळं शतकमोहत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे.



दरवर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा ढोल-ताशाच्या गजरात पार पडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात हा पाटपूजन सोहळा पार पडला. यावेळी हजारो गणेशभक्तांनी हजेरी लावली. मुंबईतल्या प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं हे मंडळ अतिशय आकर्षक देखावे सादर करतात. मात्र यंदाचा देखावा अजूनही गुलदस्त्यात असून तो गणेश चतुर्तीच्या दिवशी सर्व गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे.


- विकास सावंत, उपाध्यक्ष, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ.


चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती दरवर्षी मूर्तीकार विजय खातू यांच्या कारखान्यात तयार केली जाते. मात्र गेल्यावर्षी विजय खातू यांच्या निधनामुळे यंदा विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू या मंडळाची मूर्ती साकारणार आहेत.



हेही वाचा

गणेशगल्ली साकारणार इकोफ्रेंडली सूर्यमंदिर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा