Advertisement

मुंबईत होळीला मनाई; व्यावसायिकांवर आर्थिक संकट

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून, यंदा कोरोना संसर्गाचा फटका सर्वच सण, उत्सवांना बसला आहे.

मुंबईत होळीला मनाई; व्यावसायिकांवर आर्थिक संकट
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून, यंदा कोरोना संसर्गाचा फटका सर्वच सण, उत्सवांना बसला आहे. अवघ्या ४ दिवसांवर आलेल्या होळीवर ही कोरोनाचं सावट आलं आहे. महापालिकेनं (bmc) होळी साजरी करण्यास मनाई केल्यानं होळीचं समान विकणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. प्रशासनाचे निर्बंध असल्याने होळी आणि रंगपंचमीशी संबंधित लहान-मोठ्या व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं वर्षभरापासून विविध सण, उत्सवावर पाणी पडले आहे. कोरोनाबाधितांच्या शहर परिसरात वाढणारी संख्येमुळं उत्सवावर निर्बंध लादले गेले आहेत. होळी आणि त्यानंतरची धुळवड, रंगपंचमी यास अपवाद नाही. मागील वर्षी मार्चअखेरीस करोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. त्यावेळी कोरोनाच्या सावटाखालीच होळी आणि रंगपंचमीचा आनंद नाशिककरांनी घेतला. परंतु, त्यानंतर कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, टाळेबंदी यामुळे सण, उत्सव करोनाच्या सावटाखाली साजरे झाले.

आदिवासी भागात होळीला विशेष महत्व आहे. परंतु, कोरोनामुळे शहरात अडकलेले नागरिक गावाकडे परततील की नाही, याविषयी साशंकता आहे. एरवी महिनाभर आधी होणाऱ्या होळीच्या तयारीचा मागमूसही ग्रामीण भागात नाही. शहर परिसरात रंग, पिचकाऱ्या, पाण्याचे फुगे दुकानांमध्ये आले असले तरी त्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा