Advertisement

गणपती बाप्पासोबत गौरीलाही निरोप!


गणपती बाप्पासोबत गौरीलाही निरोप!
SHARES

गुरुवारी ७ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. अतिशय जड अंत:करणाने भक्तांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पांबरोबच २ दिवस माहेरी आलेल्या गौरींचेही विसर्जन झाले. आठवडाभर घरात असलेल्या बाप्पाला निरोप देताना भक्तांचेही डोळे जड झाले होते.



गौरींना खेकड्याचा नैवेद्य!

सकाळी गौरींची पूजा केल्यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. कोळी बांधवांमध्ये खेकड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. खेकडा खाताना आपल्याला दोन्ही हातांचा वापर करावा लागतो. मुलगी लग्न करून सासरी गेली, की तिला दोन्ही हातांनी मनसोक्त खेकडा खाता येत नाही. त्यामुळे मुलगी माहेरी गौरीच्या सणांना आली, की तिला मनसोक्तपणे खेकडा खाता यावा यासाठी गौरींना खेकड्याचा नैवेद्य दाखवला जातो.

आमच्याकडे ७ व्या दिवशी गणपती आणि गौरी अशा दोघांचे विसर्जन करण्यात येते. यावर्षी जशी पावसाने कृपादृ्ष्टी दाखवली, तशीच पुढच्या वर्षीही असू दे, सर्वांना सुखी-समाधानी ठेव हेच मागणे आम्ही आमच्या बाप्पाकडे मागितले आहे. 

स्वप्नाली बहुलेकर

प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नैवेद्य दाखवायची पद्धत असते. अनेक ठिकाणी गव्हाची, गवल्यांची खीर असते. तर अनेक ठिकाणी कानवले (करंजी)चा नैवेद्य दाखवला जातो. अशा वेगवेगळ्या पध्दतीने गौराईला पोटभर जेवायला घालून मगच निरोप दिला जातो.


संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी

सार्वजनिक गणपती - 197

घरगुती गणपती - 9996

गौरी - 1100



हेही वाचा

अजूनही तिथे 125 वर्षांपूर्वीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा होतो!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा