Advertisement

बी.डी.डी. चाळीत आलाय 'कोरोना' व्हायरस, रहिवाशी करणार होळीला दहन

बी.डी.डी. चाळीत सर्व देशाला घाबरून ठेवणारा भयंकर कोरोना व्हायरस आणि वर्ध्यातील हिंगणघाट इथं शिक्षिकेला जाळणाऱ्या नराधम आरोपीची होळी तयार केली जात आहे.

बी.डी.डी. चाळीत आलाय 'कोरोना' व्हायरस, रहिवाशी करणार होळीला दहन
SHARES

वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर उंच होळी उभारण्यासाठी मुंबईतील वरळीमधील बी.डी.डी. चाळ खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळं 'होळी' हा सण आला की सर्व मुंबईकरांचं लक्ष वरळीतील बी.डी.डी. चाळीकडं लागतं. यंदाही बी.डी.डी. चाळीत सर्व देशाला घाबरून ठेवणारा भयंकर कोरोना व्हायरस आणि वर्ध्यातील हिंगणघाट इथं शिक्षिकेला जाळणाऱ्या नराधम आरोपीची होळी तयार केली जात आहे.

मुंबईसह राज्यभरात परदेशी कोरोना व्हायरसमुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं या कोरोना व्हायरसची भिती नागरिकांच्या मनातून घालविण्यासाठी बी.डी.डी चाळ क्र. ७८ व ७९ मधील वीर नेताजी क्रीडा मंडळ यांच्याकडून 'कोरोनासूर' याचं दहन करण्यात येणार आहे.

एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित शिक्षक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळं बी.डी.डी. चाळ क्र. ७६ व ७७ येथे होळीनिमित्त श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ त्या नराधमाचा पुतळा तयार करणार असून, त्याच दहन करणार आहे.


वरळी बी.डी.डी. चाळीतील होळीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात येते. त्याचप्रमाणं होळी म्हटली की, रंगबेरंगी रंगांची उधळण होत असते.

गतवर्षी 'पब्जी' गेमपासून तरुणाई सावध व्हावी, यासाठी वरळीतील बी.डी.डी. चाळ क्र. ७६ व ७७ येथे होळीनिमित्त श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने 'पब्जी'चा पुतळा उभारून होळी सजवली आहे. तर, बी.डी.डी चाळ क्र. ७८ व ७९ मधील वीर नेताजी क्रीडा मंडळ यांनी 'मसूद अजहर' याची होळी उभारली आहे.हेही वाचा -


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा