Advertisement

काळाचौकी गणेशोत्सव मंडळ साकारणार छोटाभीमचा देखावा

काळाचौकी गणेशोत्सव मंडळ यंदा लहानग्यांसाठी छोटा भीम या कार्टून थीमवर आधारीत देखावा साकारणार आहे. मंगळवारी ३१ जुलैला अंगारकी चतुर्थीचा योग साधून मंडळाच्या बाप्पांचा पाद्य पूजन सोहळा संपन्न झाला.

काळाचौकी गणेशोत्सव मंडळ साकारणार छोटाभीमचा देखावा
SHARES

गणेशोत्सवात बच्चे कंपनींसाठी खास देखावा सादर करणारं मंडळ अशी काळाचौकी गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे. हीच ओळख कायम राखत यंदा हे मंडळ लहानग्यांसाठी छोटा भीम या कार्टून थीमवर आधारीत देखावा साकारणार आहे. मंगळवारी ३१ जुलैला अंगारकी चतुर्थीचा योग साधून मंडळाच्या बाप्पांचा पाद्य पूजन सोहळा संपन्न झाला. 


छोटा भीम मुलांच्या भेटीला

काळाचौकी गणेशोत्सव मंडळाचं हे ६३ वं वर्ष आहे. मागील ४ वर्षांपासून खास लहान मुलांसाठीच या मंडळातर्फे बाप्पांची आरास सजवली जाते. त्यानुसार यावर्षी मंडळामध्ये छोटा भीम आणि त्याचे सहकारी मुलांच्या भेटीला येणार आहेत.

यामध्ये छोटा भीमसह, छुटकी, राजू, जग्गू, कालिया, ढोलू, कान्हा ही सर्व पात्र असणार असतील. घाटकोपरचे प्रसिद्ध सजावटकार अभिषेक  शेलार हा देखावा तयार करणार अाहेत. येत्या ७ ते ८ सप्टेंबरपर्यंत या देखाव्याचं काम पूर्ण होईल. त्यांच्यासोबत १० ते १२ कारागीर मिळून हे काम पूर्ण करतील. या देखाव्यासाठी अंदाजे ७ ते ८ लाख रुपये खर्च येणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.


यापूर्वीही मंडळाने डिस्नेलँड, टेंपल रन, जंगल बुक अशा थीमवरील देखावे साकारले होते. दरवर्षी आमच्या मंडळातील आरास मुलांसाठी एक पर्वणी असते. त्यामुळे दरवर्षी देखावा बघण्यासाठी लहानग्यांची मोठी गर्दी होते. यंदासुद्धा लहान मुलांना आवडणारा विषय निवडण्यात आल्याने चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- शेखर साळवी, सचिव, काळाचौकी गणेशोत्सव मंडळ


हेही वाचा -

राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? हायकोर्टाचा खडा सवाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा