'कशिश' एलजीबीटीक्यू फिल्म फेस्टिव्हलला 24 मे पासून सुरूवात

 Churchgate
'कशिश' एलजीबीटीक्यू फिल्म फेस्टिव्हलला 24 मे पासून सुरूवात
Churchgate, Mumbai  -  

मुंबईतील 'एलजीबीटी' समुहाच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या 'कशिश' आंतरराष्ट्रीय क्वीर चित्रपट महोत्सवाला 24 मे पासून मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमागृहात सुरूवात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात इजिप्त, इराण, सर्बिया सहित 45 देशांतील 147 चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. या महोत्सवाला नि:शुल्क प्रवेश असून महाेत्सवाच्या आयोजनासाठी 3 लाख रुपयांचा निधी 'लोकदेणगी'तून उभारण्यात आलेला आहे.

महोत्सवात दाखवले जाणारे सर्व चित्रपट 'एलजीबीटी' (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर, इंटरसेक्स) समुदायाच्या विविध समस्या आणि नातेसंबंधावर आधारीत असणार आहेत. आयोजकांना एकूण 1 हजार 200 चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी 147 चित्रपटांची महोत्सवासाठी निवड करण्यात आली. हे सर्व चित्रपट मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमागृह आणि अलायन्स फ्रॅन्चाइज, न्यू मरिन लाईन्स येथे दाखवण्यात येतील. 'सीग्नेचर मूव्ह' या अमेरिकन चित्रपटापासून महोत्सवाला सुरूवात होईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंजुरीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. 'कशिश' भारतातील पहिला 'एलजीबीटी' चित्रपट महोत्सव आहे. या चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी समलैंगिक असणे आवश्यक नाही.

कार्यक्रम -
काय : काशिश मुंबई इंटरनॅशनल क्वीर फिल्म फेस्टिव्हल
केव्हा : 24 मे ते 28 मे
कुठे : लिबर्टी सिनेमा, मरिन लाइन्स और अलायन्स फ्रॅन्चाइज, न्यू मरिन लाइन्स
प्रवेश : मोफत

Loading Comments