'म' मराठीचा!


  • 'म' मराठीचा!
SHARE

दादर - मराठी साहित्याच्या नभांगणातले तेजःपुंज दिवंगत वि. वा. शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मुंबई लाइव्ह’ने संस्मरणीय ठरवला. कुसुमाग्रजांनी साहित्यविश्वाला दिलेल्या असामान्य योगदानाची दखल घेत 27 फेब्रुबारी हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘राजभाषा मराठी दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘राजभाषा मराठी दिन’ झोकात साजरा करण्यासाठी माध्यमक्षेत्रात नावाजलेले आणि कवितांच्या प्रांतात मुशाफिरी करणारे पत्रकार कम कवी प्रशांत डिंगणकर, सुनील तांबे, सुरेश ठमके आदी ‘मुंबई लाइव्ह’च्या कार्यालयात दाखल झाले. मग काय? कविता, किस्से, अनुभवकथन यांची लयलूट न होते तरच नवल! खरंतर ही मंडळी ‘न्यूजलेस कविता’ या कार्यक्रमाचं सादरीकरण करतात. मात्र खास ‘मुंबई लाइव्ह’च्या प्रेक्षकांसाठी त्यांनी आपल्या संहितेपलीकडचा कार्यक्रम सादर केला. त्याच त्याच साहित्यकृतींचं सादरीकरण, शब्दबंबाळ परिसंवाद, मराठी भाषेबद्दल वृथा अरुण्यरुदन या साचेबद्ध रचनेतून बाहेर पडत प्रशांत डिंगणकर यांनी सादर केलेल्या कुसुमाग्रजांच्या तसंच स्वलिखित कविता, सुरेश ठमके यांच्या ‘हायकू’ आणि सुनील तांबे यांच्या मराठी गझलने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या