Advertisement

Dahi Handi 2021: दहीहंडी उत्सवाबाबत समन्वय समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक


Dahi Handi 2021: दहीहंडी उत्सवाबाबत समन्वय समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला दहीकाला उत्सव बंद करण्यात आला. कोरोनाच्या भीतीमुळं गतवर्षी दहीकाला उत्सव साजरा न करण्याच आवाहन राज्य सरकारनं केलं होतं. परंतु सध्या मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असून, अनेक सोयी-सुविधा या सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा दहीकाला उत्सव साजरा करायचा की नाही याबाबत सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक होणार आहे.

या बैठकीत मागील वर्षीप्रमाणे यंदासुद्धा दहीहंडी साजरी होणार नाही की निर्बंधांच्या अटी घालून दहीहंडीला राज्य शासनाकडून परवानगी देण्यात येणार हे सोमवारी दुपारर्यंत स्पष्ट होणार आहे. शिवाय या संदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. यावर आज चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून देशभरात कोरोना ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर कोरोनाचं सावट असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी सर्वच उत्सव रद्द करावे लागल्यामुळं गणेश मंडळांपासून ते दहीहंडी मंडळांपर्यंत सर्वांचीच निराशा झाली होती. गणेशोत्सव देखील मर्यादित स्वरुपात फक्त घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर यंदा कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर दहीहंडीला आणि इतर उत्सवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. वेगवेगळ्या दहीहंडी मंडळांनी राज्य सरकारने छोट्या प्रमाणात का असेना दहीहंडी साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा