Advertisement

मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी सिडकोकडून भूखंड

नवी मुंबईतील ऐरोली येथे हे उपकेंद्र होणार असून त्यासाठी लागणारा भूखंड सिडकोच्यावतीने मराठी भाषा विभागाला देण्यात आला.

मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी सिडकोकडून भूखंड
SHARES

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर आता उपकेंद्र उभारणीस गती मिळणार आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे हे उपकेंद्र होणार असून त्यासाठी लागणारा भूखंड सिडकोच्यावतीने मराठी भाषा विभागाला देण्यात आला. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी यासंबंधीची कागदपत्रे स्वीकारली.

नवी मुंबईतील या उपकेंद्रात भाषा संचालनालय, विश्वकोष महामंडळाची कार्यालये असतील. याशिवाय भव्य सभागृह, बालविभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी दालने असतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने ही वास्तू उभारली जाणार आहे.

अतिशय सुंदर असे हे उपकेंद्र असेल. नवी मुंबईत एक सांस्कृतिक केंद्र म्हणून हे भवन दिमाखात उभे राहणार आहे. मराठी संस्कृती जतनाच्या कार्यात यामुळे भर पडेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी सिडको, एमआयडीसी व मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- ‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी- सुभाष देसाई

त्याआधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे. याखेरीज मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे, याची माहिती ग्रंथ किंवा प्रदर्शनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली.

मराठी माणसांना अभिजात मराठीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. परंतु ही अभिजात मराठी नेमकी कशी आहे, याची माहिती सर्वसामान्यांना मिळत नाही. ती विविध माध्यमांतून सर्वसामान्यांना उपलब्ध झाली पाहिजे. महाराष्ट्री (maharashtra) प्राकृत ते मराठी अशा उत्क्रांती साखळीची सर्वांना ओळख झाली पाहिजे. विविध माध्यमांद्वारे मराठी भाषेचं मूळ जनतेपर्यंत पोहोचविलं पाहिजे अशी सूचना सुभाष देसाई यांनी केली.

हेही वाचा- भारताबाहेरील मराठी माणसांसाठी स्पर्धा; जर्मनी, द. कोरिया, सिंगापूर, अमेरिकेतील स्पर्धक ठरले विजेते

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा