Advertisement

सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद

मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर पुढील आदेश येईपर्यंत भाविकांसाठी ३० एप्रिलपर्यंत बंद राहिल.

सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद
(File Image)
SHARES

महाराष्ट्रातील covid 19 रुग्णांमध्ये वनाढ होताना दिसत आहे. यासाठीच महाराष्ट्र शासनानं नवीन मार्गदर्शक सूचना आणि निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार आता मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर पुढील आदेश येईपर्यंत भाविकांसाठी ३० एप्रिलपर्यंत बंद राहिल.

तथापि, मंदिरातील आतील दैनंदिन कामकाज औपचारिक वेळेत सुरूच आहे. फक्त निवास आणि प्रसादलय (भाविकांसाठी जेवणाचे हॉल) बंद राहतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, आज रात्री ८ वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिरात दर्शन होणार नाही. दर्शनासाठी क्यूआर कोड देणं देखील बंद केलं गेलं आहे. परंतु थेट पूजा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जाईल. आरतीवेळी केवळ पुजारी आणि कर्मचारी हजर राहतील.

महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अधिसूचनेनुसार COVID 19 रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे धार्मिक स्थळे बंद राहतील. त्यामुळे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टनंही (एसएसएसटी) महाराष्ट्रातील शिरडी इथलं साई बाबा मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारनं नाईट कर्फ्यू आणि वीकएन्ड कर्फ्यूसह राज्यात लॉकडाउनसारखे निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे ५ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहेत.

कोरोनव्हायरसच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. सोमवारी, ५ एप्रिलला मुंबईत तब्बल ९ हजार ८५७ रुग्ण नोंदवली गेली. ज्यात शहरातील एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ६२ हजार ३०२ वर पोहचली आहे. सुमारे ७४ हजार ५२२ एक्टिव्ह रुग्ण आहेत. आणखी २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ११ हजार ७९७ वर पोहोचला आहे.



हेही वाचा

अबब! मुंबईतील घर विकलं गेलं तब्बल १ हजार कोटींना

आता हेलिकाॅप्टरने जा 'जीवदानी'च्या दर्शनाला, भाविकांसाठी खास सुविधा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा