प्रयत्न ऐतिहासिक वारसा जपण्याचा

कलिना - मुंबई विद्यापीठ कलिना स्पोर्ट्स कॉम्लेक्स इथं भूविज्ञानशास्त्र आणि पुरातत्वशास्त्र या विषयांवर अनुसरून प्रदर्शन भरवण्यात आलंय. हे प्रदर्शन 15 ते 18 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रवेश विनामुल्य असणार आहे.

प्रदर्शनासोबत विविध खेळ आणि उपक्रमही या कालावधीत राबवले जाणार आहेत. जेणेकरून प्रदर्शन पहावयास येणाऱ्यांना भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक गोष्टींची माहिती आणि महती कळेल असं भारतीय विद्याभवन, मुंबई विद्यापिठाच्या शिक्षिका आणि अभ्यासक डॉ. प्राची मोघे यांनी सांगितलं. हे प्रदर्शन केवळ विद्यार्थांसाठीच नाही तर सर्वांसाठीच आहे. या उपक्रमात माजी विद्यार्थांचा देखील सहवास लाभल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading Comments